Maharashtra Politics : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयानंतर निकम यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपणच मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केल्याचे निकम यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी सोशल मीडियात एक पोस्ट करत निकम यांच्या नियुक्तीची माहिती दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना निकम म्हणाले, माझ्या नियुक्तीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थांकडून सतत मागणी करत होते. कालही त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मी व्यथित झालो होतो. मी काल मुख्यमंत्र्यांना हा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे, असे कळवले. त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे मला आज समजले.
मस्साजोग ग्रामस्थांनी आता उपोषण सोडावे, असे मी आवाहन करतो. या देशात कायदा आणि न्याय सर्वोच्च आहे, त्यामुळे आपण असे कुठलेही कृत्य करू नये, जेणेकरून प्रकृतीला त्रास होईल. तपासयंत्रणा जेव्हा आरोपपत्र सादर करतील, त्यावेळी आम्ही हा खटला तातडीने चालवण्यास घेऊ, असे आश्वासन देतो, असे निकम यांनी स्पष्ट केले.
नियुक्तीला विरोधकांकडून विरोध होत असल्याबाबत निकम यांना विचारले असता ते म्हणाले, माझ्या नियुक्तीचे राजकीय पडसाद उमटतील, याची मला आधीच कल्पना होती. हे मुख्यमंत्र्यांनाही सांगितले होते. राजकारणात यापूर्वी विरोधी पक्षाचे अनेक वकील आहेत, होते. मी कधीही यापूर्वी राजकारणा सक्रीय नव्हतो. मी अभिमानाने सांगेन की, राजकारणात जरी असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कुणीही, कुठेही आडवे येऊ शकत नाही, असे निकम यांनी ठणकावून सांगितले.
विरोधकांचे काही म्हणणे, गाऱ्हाणे असेल तर त्याला मी काही महत्व देत नाही. कारण विरोधासाठी विरोध करणे, हा त्यांचा सध्या स्थायी स्वभाव आहे, असा निशाणा निकम यांनी विरोधकांवर साधला. अजून मी आरोपपत्र पाहिलेले नाही. आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच त्यावर बोलू शकेन, असेही निकम यांनी खटल्याबाबत बोलताना स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.