Raigad Fort: तुतारी वाजविणारा माणूस हे पक्षचिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने बहाल केले आहे. त्यानंतर शरद पवार गट सक्रिय झाला आहे. या पक्ष चिन्हाचे थेट किल्ले रायगडावरून अनावरण आज होत आहे.
शरद पवार गट थेट किल्ले रायगडावरून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीकास्त्र डागले. (Sharad Pawar faction to sound tutari from Raigad Fort)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'शिवाजी महाराजांनी स्वराजाचे तोरण या रायगडावर बांधले. याच ठिकाणी टकमक टोक आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांचा कडेलोट येथून करण्यात येत होता. असाच गद्दार या रायगड जिल्ह्यात आहे. त्यांनी शरद पवारसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांचाही कडेलोट रायगडची जनता केल्याशिवाय राहणार नाही,'अशी टीका प्रशांत पाटील यांनी खासदार सुनील तटकरे यांचे नाव न घेता रायगडावर केली.
तुतारीचे चिन्ह मिळाल्याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले. रायगडावरून जयंतराव म्हणाले, "केंद्रीय निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजे, त्यांनी आम्हाला तुतारी हे चिन्ह दिले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आज शरद पवार फुंकणार आहेत. आज पुन्हा नव्या लढ्याची सुरुवात रायगडावरून आम्ही करीत आहोत,"
रायगडावरील आज होत असलेल्या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह, खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत. कार्यक्रमाचा टीझरही शरद पवार गटाने एक्स खात्यावर प्रदर्शित केला आहे. टीझरमध्ये शरद पवारसाहेबांच्या साथीने विकासाचे रणशिंग फुंकले जाणार आहे, असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीपर्यंत तुतारी वाजविणारा माणूस हे पक्षचिन्ह कायम राहणार आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या आवाजातील या टीझरमध्ये आता अवघा देश होणार दंग, शरद पवार यांच्या साथीने फुंकले जाणार विकासाचे रणशिंग, असा उल्लेख करण्यात आला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.