Mahua Moitra : महुआ मोईत्रा यांना हायकोर्टाचा दणका; ईडी विरोधातील याचिका फेटाळली

Mahua Moitra News: दिल्ली उच्च न्यायालयाने मोईत्रा यांची ईडी विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे.
Mahua Moitra
Mahua Moitra Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांना दिल्ली हायकोर्टाने झटका दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मोईत्रा यांची ईडी विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. ईडीकडून माध्यमांमध्ये मोईत्रा यांची खासगी माहिती प्रसारित केली जात असल्याचा आरोप करत त्यावर निर्बंध घालण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली आहे. सध्या ईडीकडून मोईत्रा यांची परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) अंतर्गत चौकशी सुरू आहे. (Mahua Moitra )

ईडी विरोधातील याचिकेमध्ये मोईत्रा यांनी म्हटले आहे की, ईडीकडून पारदर्शकपणे चौकशी करण्याऐवजी या चौकशीसंबंधित इतर संवेदनशील माहिती प्रसारित करण्याचा हेतू दिसत आहे. लीक झालेल्या माहितीमध्ये ईडीकडून चौकशीनंतर झालेल्या काही आरोपांचा देखील यामध्ये समावेश आहे. त्यामुळे ईडीकडून होणारी चौकशी ही केवळ पूर्वग्रह दुषित हेतूनेच होत असून त्यासोबत जनतेच्या नजरेमध्ये मोईत्रा यांची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप याचिकेमध्ये करण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahua Moitra
Manoj Jarange Latest News : मनोज जरांगेंचा गर्भित इशारा; म्हणाले, 'सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून एक इंचही...'

या प्रकरणी मोईत्रा यांनी सुरू असलेल्या चौकशी प्रकरणी कोणतीच खात्री न झालेली माहिती, खोटी माहिती, आणि अपमानित होईल, अशी कोणतीही माहिती प्रकाशित आणि प्रसारित करण्यास प्रतिबंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे. मोईत्रा यांच्या मते अशा प्रकारे माहिती लीक होत असल्यामुळे चौकशीच्या प्रक्रियेवर प्रभाव पडत आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशी करण्याच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.

तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ यांच्यावर संसदेने खासदारकी निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, मोईत्रा यांनी गुरुवारी ईडीकडून सुरु असलेल्या त्यांच्या चौकशी प्रकरणी अधिवक्ता रेबेका जॉन यांच्या माध्यमातून ही याचिका सादर केली. यामध्ये तपास यंत्रणांकडून गोपनीय माहिती माध्यमांना देण्यासंदर्भातील आरोप करण्यात आला आहे.

तसेच तपास यंत्रणांकडून मोईत्रा यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असून त्यांच्याकडून खूप काही माहिती तपास यंत्रणाकडून मागितली गेली. मात्र ती माहिती देखील आता माध्यमांमध्ये प्रसारित होणार का? असा प्रश्न त्यांनी याचिकेमध्ये उपस्थित केला आहे. तसेच जर तपास यंत्रणांकडून माहिती माध्यमांना दिली जात नसेल तर मग माध्यमांना मला चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती कशी मिळते? असा सवालही उपस्थित केला.

याप्रकरणी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने अतिरिक्त सॉलिसिटर चेतन शर्मा यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली की, मंत्रालयाजवळ अशा प्रकारे माहिती लिक करणाऱ्या स्त्रोतांची माहिती उपलब्ध नाही. तसेच ईडीकडूनही या प्रकरणाची अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची माहिती प्रसार माध्यमांना दिलेली नाही.

तसेच कोणतीही माहिती बाहेर फुटू दिली नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दरम्यान, या सर्वबाजू ऐकून घेतल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुब्रम्हण्यम प्रसाद यांच्या खंड पीठाने मोईत्रा यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे मोईत्रा यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Mahua Moitra
Pune Drugs Racket : ड्रग्ज रॅकेट प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक; अजितदादांची गाडी अडवून विचारणार जाब

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com