Sharad Pawar On Raj Thackeray : 'कधी जागे झाले, तर ते असं बोलतात'; पवारांनी ठाकरेंना, असं काही फटकारलं की, बस्स!

Sharad Pawar on Caste based politics in Maharashtra : राज ठाकरे यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देताना राज्यातील जातीपातीच्या राजकारणावर बोलले. शरद पवार यांच्याकडे रोख येताच त्यांनी राज ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे.
Sharad Pawar On Raj Thackeray
Sharad Pawar On Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar In Pune : राज ठाकरे यांनी आषाढी एकादशीनिमित्ताने एक्स खात्यावरून शुभेच्छा दिल्या असल्या, तरी त्यात राज्यात सुरू असलेल्या जातीपातीच्या राजकारणाचा उल्लेख केला आहे. राज ठाकरे यांचा हा रोख शरद पवार यांच्याकडे असल्याचे म्हटले जाते.

शरद पवार यांनी यावर राज ठाकरे यांना असं काही फटकारलं आहे की, बस्स! "हे त्यांचे वैशिष्ट्यच आहे. कधी जागे झाले, तर ते असं बोलतात. ज्याच्यावर टिप्पणी केली, की लोक दखल घेतात, त्यांच्यावर राज ठाकरे बोलतात आणि टिप्पणी करतात", अशा शब्दात पवार यांनी ठाकरे यांना फटकारले आहे.

शरद पवार (Sharad Pawar) आणि राज ठाकरे यांच्यातील राजकीय संबंधावर नेहमीच चर्चा होते. राज ठाकरेंनी शरद पवार यांच्या राजकारणावर नेहमीच बोलतात. त्यावरून बराच वाद देखील झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांमध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. शरद पवार स्पेशल दुर्लक्ष केले होते. राज ठाकरे यांनी आता आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देणारा संदेश त्यांच्या 'एक्स' खात्यावर पोस्ट केला आहे.

Sharad Pawar On Raj Thackeray
Sharad Pawar : 'शेकाप'च्या जयंत पाटलांचा पराभव कसा झाला? नेमकं कुठं चुकलं? शरद पवारांनी गणित मांडलं

यात त्यांनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणावर गंभीर टिप्पणी केली आहे. महाराष्ट्रात गेल्या दशकभरात जे जातीपातीचं विष पसरलंय ते समूळ नष्ट होऊ दे, अशी प्रार्थना केली. जातीपातीच्या राजकारणामुळे राज्य अस्थिर झाल्याचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी ही टिप्पणी शरद पवार यांच्याकडे रोख करणारी असल्याचे म्हटले जात आहे. राज ठाकरे यांच्या या पोस्टखाली तशा प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

Sharad Pawar On Raj Thackeray
Devendra Fadnavis And Ajit Pawar : मोठी बातमी! राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर ढगात भरकटलं अन्...

शरद पवार यांनी पुणे येथे दुपारी पत्रकार परिषद झाली. शरद पवार यांचे राज ठाकरे यांच्या टिप्पणीवर लक्ष वेधले असताना, त्यांनी राज ठाकरे यांना चांगलेच फटकारले. "राज ठाकरे यांचे हे आजचं नाही. त्यांची अशी वक्तव्य आजची नाहीत. त्यांनी यापूर्वी अशा टिप्पणी केल्या आहेत. ते नेहमीच असं बोलतात. ते त्यांचं वैशिष्ट्यच आहे. ते 8-10 दिवसांनी, महिन्याने, दोन महिन्यांनी कधी जागे झाले, तर ते असे बोलतात. साधारणत: ज्याच्यावर टिप्पणी केली, की लोक दखल घेतात, त्यांच्यावर राज ठाकरे बोलतात आणि टिप्पणी करतात", असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

जातीपातीवर काय बोलले राज ठाकरे

राज ठाकरे यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. जगातील एकमेव आणि दीर्घ अशी परंपरा आहे. तसेच हिंदू धर्मातील यात्रांचा देखील राज ठाकरेंनी उल्लेख केलाय. देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव आहे. त्यामुळे अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना हा देव आपलासा वाटतो. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे, असं म्हणत दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत चालले आहे की हाच तो का महाराष्ट्र, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

सात ते आठ वर्षांचा मुला-मुलींचा संदर्भ देत जातीपातीचे संदर्भ राज ठाकरे यांनी दिला आहे. फोडा आणि राज्य करा, या ब्रिटिशांच्या नीतीला मराठी समाज पुरून उरला. पुढे मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर ‘महा’राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिला. मात्र अचानक सत्ता आणि पैसा हेच, स्वप्न उराशी बळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे, हेच कळत नाही, असे म्हणत महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट करण्याची प्रार्थना विठ्ठलाकडं राज ठाकरे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com