Sharad Pawar: शरद पवारांच्या दाव्यामुळे अनिल पाटलांच्या पोटात गोळा;..पुन्हा निवडून आलेले दिसणार नाहीत!

Sharad Pawar ON Anil Patil:अनिल पाटील हे पुन्हा निवडून येणार नाहीत
Sharad Pawar, Anil Patil:
Sharad Pawar, Anil Patil:Sarkarnama
Published on
Updated on

Solapur: हिवाळी अधिवेशनानंतर शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आलेले दिसतील, असे विधान अजित पवार गटातील नेते, मंत्री अनिल पाटील यांनी नुकतेच केलं आहे. अनिल पाटलांच्या विधानाचा शरद पवारांनी समाचार घेत त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मी नुकताच अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला आहे. मतदार संघातील लोकांशी मी बोललो तेव्हा तेथील लोकांनी सांगितले की अनिल पाटील हे पुन्हा निवडून येणार नाहीत," असे शरद पवार म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार यांच्या दाव्यामुळे अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे.

Sharad Pawar, Anil Patil:
OBC Reservation: ओबीसी महाएल्गार सभेपूर्वीचं भुजबळ, मुंडे, वडेट्टीवार, जानकरांचे बॅनर फाडले!

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथमच शरद पवार माढ्यात दाखल झाले. पवारांनी माध्यमांशी चर्चा करताना विविध प्रश्नांना उत्तरं दिली. राज्यातील 48 जागांबाबत जागा वाटप बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. उरलेल्या जगांचाही निर्णय आता दिवाळीनंतर घेण्यात येईल, असे शरद पवारांनी स्पष्ट केलं.

अजित पवारांच्या भेटीवर शरद पवार म्हणाले...

दिवाळीनिमित्त गोविंदबागेत पवार कुटुंबियांनी एकत्र दिवाळी साजरी केली. अजित पवार हे पण उपस्थित होते. अजितदादा उपस्थिती राहणार की नाही, याबाबत चर्चा होती. "सत्तर वर्षांच्या परंपरेनुसार आम्ही दिवाळीला एकत्र येतो. दिवाळी सण हा आनंदाचा असतो. आनंदाच्या दिवसांमध्ये पवार कुटुंबीय एकत्र येत असते. आमची ही परंपरा गेल्या 70 वर्षांपासून सुरू आहे. आम्ही पवार कुटुंबीय कोणतेही राजकीय लवलेश न ठेवता कुटुंब म्हणून आम्ही एकत्र येत असतो. ही परंपरा ही आम्ही सर्वांनी कायम ठेवली आहे. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्याला कोणताही राजकीय लवलेश देखील नव्हता. आम्ही पवार कुटुंबीय दरवर्षी एकत्रित येतो," असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी अजित पवारांच्या भेटीवर दिले.

Sharad Pawar, Anil Patil:
Raju Shetti : EDच्या भीतीने उंदरासारखे इकडे तिकडे पळालेत! फडणवीसांना घेराव...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com