Raju Shetti On Onion Rate: केंद्र सरकारने पुन्हा शेतकऱ्यांची माती केली; कांद्यावरून राजू शेट्टींची उद्विग्न प्रतिक्रिया

Farmers Onion Rate Protest : कांद्याचे पडलेल्या दरावरून राज्यातील राजकारणही चांगलचं तापलं आहे.
Raju Shetty on Onion Rate :
Raju Shetty on Onion Rate :Sarkarnama

Kolhapur Farmer News: कांद्यावरून राज्यासह देशातले राजकारण तापले असून केंद्र सरकारने नुकताच दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारचा हा प्रकार म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशी केंद्राची अवस्था असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. गेल्या आठवड्याभरात कांद्यावरून केंद्र सरकारने दोन वेळा भूमिका बदलली. सुरुवातीला कांदा विकल्यानंतर पुन्हा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यावर शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारलाच खडेबोल सुनावले आहेत.

Raju Shetty on Onion Rate :
Doctorate Announced To Fadnavis मुख्यमंत्री शिंदेंपाठोपाठ फडणवीसही बनले डॉक्टर; उपमुख्यमंत्र्यांना जपानमधील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट जाहीर

केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. हा प्रकार म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशी केंद्र सरकारची अवस्था झालेली आहे. केंद्र सरकारने कांदा खरेदी करण्याची गरज होती तेव्हा तो विकला आणि शेतकऱ्याची माती केली. खरेदीचा दर 24 रुपये ऐवजी किमान 30 रुपये हवा होता. अशी अपेक्षा शेट्टी यांनी व्यक्त केली. कांद्याची दरवाढ ही महिनाभर टिकेल पुन्हा कांद्याचे दर खाली येतील. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. केंद्र सरकारने असे माकड चाळे करू नयेत, असा सज्जड दम ही शेट्टी यांनी दिला आहे.

Raju Shetty on Onion Rate :
Amol Kolhe Onion Agitation : सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली; अमोल कोल्हे आंदोलनावर ठाम

कांद्याचे पडलेल्या दरावरून राज्यातील राजकारणही चांगलचं तापलं आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर तब्बल ४० टक्के निर्यात शुल्क लागू केल्याने शेतकऱ्यांमधील असंतोष वाढला आहे. यामुळे शेतमालाचे दर कमी करण्याचे षडयंत्र केंद्र सरकार करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रश्नी लक्ष घालून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती फडणवीसांनी ट्विटद्वारे दिली. मात्र यातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.  

Edited By- Anuradha Dhawde

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com