Sharad Pawar On Mahayuti: पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावर ठेवलं बोट; म्हणाले, "जनतेच्या हितासाठी"

Sharad Pawar On Drought : राज्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकरी दुष्काळामुळे होरपळत आहे. मात्र राज्य सरकार अंग झटकत असून कोणताही ठोस निर्णय घेत नाही. यावरून थेट शरद पवार यांनी सरकारला इशारा दिला आहे.
Sharad Pawar, Devendra Fadanvis, Eknath Shinde
Sharad Pawar, Devendra Fadanvis, Eknath ShindeSarkarnama

Sharad Pawar On Drought: राज्यात दुष्काळाची परिस्थिती आणि ऐन दुष्काळाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विश्रांती आणि कृषीमंत्र्यांची परदेशी वारी यावरुन विरोधकांनी सरकारवर सतत टीका केली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यसरकारला सुनावलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहित दुष्काळाबाबत तोडगा काढावा, अन्यथा महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा आक्रमक पवित्रा पवारांनी घेतला आहे.

राज्यातील दुष्काळी स्थितीवरून शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आक्रमक झाली आहे. दुष्काळावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर आता शरद पवारांनी देखील मुख्यमंत्री शिंदेंना इशारा दिला आहे. राज्यात दुष्काळ पडला असताना राज्य सरकार कोणतीच भूमिका घेत नसून राज्याचे कृषीमंत्री परदेश वारीवर जात आहेत, यावरुन पवारांनी (Sharad Pawar) नाराजी व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाय सतत पत्रकार परिषद घेऊन आणि सातत्याने पाठपुरावा करूनही दुष्काळ निवारणाच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्यात दुष्काळाचे तीव्र चटके सर्वसामान्य जनतेला बसत आहे. पाणी नसल्याने सर्वसामान्यांसह शेतकरी बेजार झाला आहे. जनावरांच्या चाऱ्या-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र याबाबत सरकारची कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही.

त्यामुळे राज्यात अशीच दुष्काळाची स्थिती राहिल्यास आणि सरकारचने यावर कोणतीच भूमिका न घेतल्यास राज्यातील जनतेच्या हितासाठी संघर्षाची भुमिका घ्यावी लागेल असा स्पष्ट इशारा पवार यांनी या पत्रातून दिला आहे. तर राज्यातील दुष्काळ निवारणाबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी देखील पवारांनी केली आहे. दरम्यान, यापूर्वी शरद पवारांनी पत्रकार परिषदेतून राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारला आपले सहकार्य असेल असंही पवरांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्राद्वारे म्हटलं होतं.

शिवाय मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, अशा महत्वपुर्ण बैठकीला लोकप्रतिनिधी आणि कृषीमंत्री गैरहजर होते. ही गंभीर बाब आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलीच असेल. पण सध्याच्या कामावरून राज्य सरकार अंग झटकत असल्याचं दिसत असल्याकडे पवारांनी लक्ष वेधलं. राज्याच्या विविध भागात मागील दहा दिवसांमध्ये दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली आहे.

Sharad Pawar, Devendra Fadanvis, Eknath Shinde
Sunil Tatkare : पक्षाला अपयशाचे तोंड पाहावे लागले,तर तटकरेंना हिशेब द्यावाच लागणार

उजनी, जायकवाडी सारख्या धरणांनी तळ गाठला असून संपुर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. याच्या झळा उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला बसत आहेत. धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगांव, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये तीव्र पाणी टंचाईला शहरी आणि ग्रामीण जनतेला तोंड द्यावे लागत आहे. तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, साताऱ्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगलीच्या जत, आटपाडीत परिस्थिती चिंताजनक असल्याचे पवार यांनी पत्रात नमुद केलं आहे.

तसंच पवारांनी आपल्या पत्रात राज्यातील पाण्याच्या टँकरवरुन राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. मागील वर्षी राज्यात केवळ 1100 टँकर पाणीपुरवठा करत होते. मात्र यंदा ही संख्या 11 हजारांच्या घरात गेली आहे. टँकर उपलब्ध असूनही पाण्याच्या शोधात जावं लागत आहे. जनावरांना चारा आणि पाणी मिळत नसल्याने ते धोक्यात आले आहे.

फळबागांची स्थिती देखील बिकट झाली असून यावर सरकारने काहीच प्रयत्न केल्याचं दिसत नाहीत. त्यामुळे सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी उपाययोजनाही अद्याप हाती घेतल्या नाहीत. तळागळापर्यंत दुष्काळ निवारणाच्या योजना नेल्या नाहीत हेदेखील दुर्दैवाने नमूद करावेसे वाटतं आहे, असं पवारांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com