Sharad Pawar On PM Modi : शरद पवारांचा एकच वार; मोदींवर तोफ डागताच अख्खी भाजप उसळली !

Sharad Pawar On PM Narendra Modi : "वाजपेयींचा पॅलेस्टाईनला पाठिंबा होता, याकडे लक्ष वेधत त्यांनी गोयलसह भाजपचे ज्ञान कमी आहे," टोला हाणला.
Sharad Pawar On PM Modi
Sharad Pawar On PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar On PM Modi : आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, नंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका घेतली होती, तर सध्याच्या पंतप्रधानांनी त्याकडे दुर्लक्ष करीत इस्राईलची बाजू घेतली आहे. मात्र, आपली भूमिका स्वच्छ असायला हवी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धावर व्यक्त केले होते. त्यावर देशभरातील भाजपचे नेते तुटून पडले आहेत. पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेही त्यात मागे नाहीत. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इस्राईल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध हे पॅलेस्टाईनच्या भूमीवर सुरू आहे, यावर पवारांनी केलेल्या विधानावर आता मोठा वाद सुरू झाला आहे. ते भाजपच्या रडारवर गेले आहेत. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने सदैव दहशतवादाविरुद्ध ठाम भूमिका घेतली आहे. त्याच अनुषंगाने इस्राईल हल्ल्याबाबत मोदींची भूमिका त्यांचे जागतिक शांतता आणि सुरक्षिततेबाबत अटळ समर्पण अधोरेखित करते, असे ते म्हणाले.

Sharad Pawar On PM Modi
Sanjay Raut News : ललित पाटील मोहरा, हिंमत असेल तर दोन मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत; राऊतांचं फडणवीसांना आव्हान

"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो लोक मृत्युमुखी पडले. आजही त्याबाबत लोकांच्या मनात तीव्र संताप आणि चीड आहे. तरीही पवारांसारख्या ज्येष्ठ राजकारण्याने दहशतवादाविरुद्ध खमकी भूमिका बजावणाऱ्या नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर चुकीचे भाष्य करणे निंदनीय आणि अनाकलनीय आहे," असे पाटील म्हणाले.

Sharad Pawar On PM Modi
Dadarao Keche News : फडणवीसांचे 'खास' अन् भाजप आमदारामध्ये जुंपली!; MIDCच्या श्रेयवादातून दादाराव केचे संतापले

अत्यंत संयमी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीनींही पवारांच्या या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. मोदींनी इस्राईलचा केलेला निषेध हा जागतिक शांतता आणि सुरक्षेच्या आपल्या भूमिकेचा परिपाक आहे, असे ते म्हणाले. राजकीय परिसीमा ओलांडून दहशतवादाविरुद्ध एकत्र यावे, एवढी ही गंभीर परिस्थिती आहे, असे त्यांनी सांगितले.

दुसरे केंद्रीय मंत्री पीयूष गोय़ल यांनीही पवारांच्या वक्तव्याचा निषेध करताना त्यांच्यासारखा ज्येष्ठ नेता ते करतो, तेव्हा अस्वस्थ व्हायला होते. संरक्षणमंत्री राहिलेल्या व्यक्तीकडूनअसे वक्तव्य खेदजनक असल्याचे ते म्हणाले. भाजपचा हा टीकेचा भडिमार राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी खोडून काढला. वाजपेयींचा पॅलेस्टाईनला पाठिंबा होता, याकडे लक्ष वेधत त्यांनी गोयलसह भाजपचे ज्ञान कमी आहे, असा टोला हाणला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com