Jayant Patil on Ajit Pawar : 'भारतरत्न देण्याची घोषणा केली; मात्र दादांचं दिल्लीत ऐकतं कोण ?'

Sharad Pawar's Party Releases Manifesto : अजित पवारांच्या घोषणेवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खरमरीत टीका केली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांमध्ये निवडणुकीपूर्वी चांगलीच जुगलबंदी जुपल्याची शक्यता आहे.
Jayant Patil on Ajit Pawar
Jayant Patil on Ajit PawarSarkarnama

Pune Political News : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनामामध्ये केली आहे. यातच आता दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांमध्ये जुंपण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या या घोषणेवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे NCP प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांनी खरमरीत टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार NCP पक्षाकडून आज पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा Election Manifesto प्रकाशित करण्यात आला या जाहीरनाम्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 'शपथनामा' असं नाव देण्यात आले आहे. त्या प्रकाशन सोहळ्या दरम्यान जयंत पाटील Jayant Patil यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.Sharad Pawar's Party Releases Manifesto

Jayant Patil on Ajit Pawar
Sharad Pawar NCP Manifesto 2024: स्पर्धा परीक्षांची फी माफ करणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'गॅरंटी'

जयंत पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी होऊ शकते तो जाहीरनामाचा भाग होऊ शकत नाही. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्यावा ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. अजित पवार यांनी भारतरत्न बाबत मागणी केली असली तरी दिल्लीमध्ये त्यांचं फारसं कोणी ऐकत नसल्याचा टोला जयंत पाटील यांनी अजित पवारांना लगावला. Jayant Patil says ajit dada announced to give Bharat Ratna Yashvantrao chavan but who is listening to Dada in Delhi

यावेळी गृहमंत्री अमित शाह Amit Shah यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांवर शरद पवारांनी उत्तर दिले ते म्हणाले, 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळात भाजपचं सरकार आहे. या काळात त्यांनी शेतीसाठी काय केलं हे सर्वप्रथम लोकांच्या समोर मांडणं आवश्यक आहे. दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून शेती विषयक प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत. याबाबत सरकार काहीच बोलत नसल्याची टीका पवार यांनी केली.

Jayant Patil on Ajit Pawar
Baramati Lok Sabha: 3 आणि 32 क्रमांकावर तुतारीच राहणार..., सुळेंचा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com