Sharad Pawar : अयोध्या राम मंदिर संघर्षात शिवसेनेच्या भूमिकेबाबत शरद पवारांचं विधान, म्हणाले...

Shivsena : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही केला आहे उल्लेख, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले.
Sharad Pawar News :
Sharad Pawar News : Sarkarnama
Published on
Updated on

Ayodhya Ram Temple conflict : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावती येथे पत्रकारपरिषदेत विविध प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी अयोध्या राम मंदिर संघर्षात शिवसेनेच्या भूमिकेबाबतही प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचाही उल्लेख केला.

शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले, ''आमच्या काही सहकाऱ्यांनी असं सूचवलं. की राहुल गांधींनी दक्षिणेत पदयात्रा केली आणि उत्तरेच्या काही भागात पदयात्रा करू असं त्यांनी जाहीर केलं, परंतु ती होऊ शकलं नाही. त्याची पूर्तता त्यांनी करावी अशी सूचना आमच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar News :
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर सोहळ्याच्या VVIP यादीत राज ठाकरे IN तर उद्धव ठाकरे OUT!

याशिवाय, ''बाबरी मशीद जेव्हा पाडण्यात आली होती. तेव्हा एकच राजकीय नेते देशात होते की, ज्यांनी म्हटलं होतं हे आम्ही केलं. बाकी कुणी म्हटलं नव्हतं. त्यामुळे जो काही संघर्ष होता त्यामध्ये शिवसेनेची भूमिका होती की नाही, याबद्दल वाद घालण्यात काही अर्थ नाही. शिवसेनेची भूमिका होती हे आम्ही स्वत: बाळासाहेबांच्या(Balasaheb Thackeray) वक्तव्यांमधून ऐकलं होतं. मंदिर झालं याचा आम्हाला आंनदच आहे. मंदिर होण्यासाठी अनेकांचं योगदान आहे.'' असं यावेळी शरद पवार म्हणाले.

याचबरोबर ''तीन राज्यांचा निवडणुकीचा निकाल हा अपेक्षेप्रमाणे नाही, हे गोष्ट मान्य करावी लागेल. पण याचा अर्थ उद्याच्या निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना अडचणी आहेत असा अजिबात नाही. आज इंडिया आघाडीत आम्ही जे एकत्र आहोत, त्यांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणे याची आवश्यकता आहे आणि यासाठी खबरदारी घेण्याची आमची तयारी आहे. त्या कामास आम्ही सुरुवात केली आहे.'' असंही यावेळी शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

प्रकाश आंबेडकरांना अद्यापही इंडिया आघाडीत प्रवेश दिला गेलेला नाही. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, ''इंडिया आघाडीची नुकतीच जी बैठक झाली होती, त्यावेळी मी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या शेजारीच मी होतो. त्यावेळी मी त्यांना प्रकाश आंबेडकरांशी संपर्क साधावा असं सूचवलं होतं. प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत यावे , त्यांना घेऊन आम्ही निवडणुका लढवाव्या अशी सगळ्यांची इच्छा आहे. ''

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com