Shikhar Bank Scam Video : शिखर बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयात धाव, आर्थिक गुन्हे शाखेनी केली मोठी मागणी

Shikhar Bank scam Financial Offenses Branch : शिखर बँक घोटाळा प्रकरणात किसन कानोळे यांनी विरोध याचिका दाखल करण्याचा अधिकारच नसल्याचा आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात सांगितले.
Shikhar Bank scam
Shikhar Bank scamsarkarnama
Published on
Updated on

Shikhar Bank scam : महाराष्ट्र बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट साजर केला आहे.महाराष्ट्र शिखर बँक प्रकरण हे अजित पवार यांच्यासह 74 राजकीय नेत्यांशी निगडित आहे आहे. या प्रकरणात पुन्हा प्रोटेस्ट पीटिशन (विरोध याचिका) दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका रद्द करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.

किसन कानोळे यांना याप्रकरणी विरोध याचिका दाखल करण्याचा अधिकारच नसल्याचा आर्थिक गुन्हे शाखेचा कोर्टात दावा केला.तसेच याचिकाकर्ता याप्रकरणाशी कुठेही संबंधित नसल्याने त्यांची याचिका देखील न स्वीकारण्याची तपासयंत्रणेकडून कोर्टाला विनंती करण्यात आली.

Shikhar Bank scam
Ramtek Assembly Election : केदारांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली; भास्कर जाधवांनी डागली तोफ

दुसऱ्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल

गेल्या अनेक दशकांपूर्वीची कागदपत्रच उपलब्ध नसल्याने तपासात अडचणी, उपलब्ध पुराव्यांनुसार कोणताही गैरव्यवहार झाल्याचे पुरावे नाहीत. त्यामुळे तपास बंद करत असल्याचे सांगत ईओडब्ल्यूकडून दुसऱ्यादां याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला होता.

अण्णा हजारे, शालिनी पाटील यांचे आरोप

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, शालिनीताई पाटील, माणिकराव जाधव यांच्यासह सुरेंद्र मोहन अरोरा आणि अन्य काही जणांनी दाखल केल्यात तपासयंत्रणेविरोधात प्रोटेस्ट पीटीशन करत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून केलेल्या कर्जवाटप आणि वसुलीत 25 हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.

Shikhar Bank scam
Vanchit Bahujan Aaghadi : 'वंचित'च्या 'या' निर्णयामुळे भाजपला दिलासा अन् काँग्रेसचं वाढणार टेन्शन?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com