Shirdi Lok Sabha 2024: MNS च्या एन्ट्रीने शिर्डीत 'शिवसेने'सह 'रिपाइं'ची डोकेदुखी

MNS ON Shirdi Lok Sabha Constituency 2024: शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार निश्चित नसतानादेखील महायुतीतील घटक पक्षांकडून जोरदार रस्सीखेच सुरू दिसते.
Shirdi Lok Sabha 2024
Shirdi Lok Sabha 2024Sarkarnama
Published on
Updated on

Nagar: शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Constituency 2024) महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार निश्चित नसतानादेखील महायुतीतील घटक पक्षांकडून जोरदार रस्सीखेच सुरू दिसते.

शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचा येथे खासदार आहे. भाजपने मात्र या मतदारसंघावर दावा केला आहे. यातच महायुतीत भाजपने मनसेला (MNS)आमंत्रण दिल्याने या जागेबाबत आणखीच संभ्रम निर्माण झाला आहे. काही दिवसांतच ही जागा महायुतीकडून कोण लढणार याचा फैसला होईल. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मनसेला ही जागा जाणार असल्याच्या चर्चेने जार पकडलाय. त्यामुळे ही जागा महायुतीत कोणाकडे? याची राजकीय चर्चा रंगली आहे.

भाजप आणि शिवसेना युती असताना ही जागा शिवसेनेकडे होती. या मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेनेचा खासदार सलग दोन वेळा निवडून आला आहे. शिवसेना फुटल्यानंतर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले.

आता २०२४ च्या निवडणुकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडे ही जागा आहे. परंतु महायुतीत असलेले रिपाइं आठवले गटाने या जागेवर दावा सुरू केला आहे. इतर समाज घटकांनीदेखील उमेदवारीची मागणी केली आहे. रिपाइं आठवले गटाने राजकीय दबाव वाढवला आहे. राज्यसभा आदला-बदली करण्याची मागणी आठवले गटाकडून महायुतीकडे करण्यात आली आहे. यावर भाजपने अजून मौन धरले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shirdi Lok Sabha 2024
Manoj Jarange News: 'शिंदे-फडणवीसांनी खोटं बोलून डाव साधला, आचारसंहिता संपल्यावर गाठ माझ्याशी...'

महायुतीत येण्याच्या संभाव्य चर्चेने मनसे हादेखील शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी तयारीत आहे. मनसेला राज्यात तीन जागा हव्या आहेत. यात शिर्डीचादेखील समावेश असल्याचे सांगितले जाते. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे निष्ठावंत सहकारी बाळा नांदगावकर यांना शिर्डीतून उमेदवारी मिळू शकते. तसे बाळा नांदगावकर यांना राज ठाकरे यांनी सांगितले, तर नंदूरबारमधून लढ, तर त्याचीदेखील तयारी असल्याचे संकेत दिलेत. बाळा नांदगावकर यांचा शिर्डीत चांगला संपर्क आहे.

शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या छगन भुजबळ यांचा पराभव करणारे बाळा नांदगावकर राज्यात राजकीय चर्चेत असतात. मनसेची एन्ट्री शिर्डीत झाल्यास, महायुतीकडून मनसे आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना अशी अटीतटीची लढत रंगतदार होईल.

भाजपची राजकीय खेळी

महायुतीत असलेला भाजपने राज्यातील पहिल्या यादीत २० उमेदवार जाहीर करून कामाला लागले आहे. राज्यात तरी भाजपने प्रचारात वेग पकडलेला दिसतो. मात्र, भाजपने महायुतीत इतर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजितदादा गट, रिपाइं आठवले गट, मनसेसह इतर सहकारी पक्षांना चर्चेत अडकवून ठेवले आहे.

भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा महायुतीमधील इतर घटक पक्षांचा विरोध दूर करण्याची यशस्वी खेळी केल्याचे दिसते. महायुतीत मनसेला घेऊन रिपाइं आठवले गटाला शह देण्याचीदेखील भापजची राजकीय खेळी दिसते. मनसेला ही जागा गेली तर शिवसेना शिंदे गटाला नगर जिल्ह्यातील हक्काच्या जागेवर पाणी सोडावे लागणार आहे.

शिर्डीत राजकीय गरमागरमी

शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे. अनुसूचित जातीतील विविध जात समूहांनीही शिर्डीत आपल्याला प्रतिनिधित्व मिळण्याची मागणी करीत खळबळ उडवून दिली आहे. रिपब्लिकन जनतेत बौद्ध, चर्मकार, मातंग उमेदवारीवर घमासान सुरू आहे. एकमेकांवर दोषारोप व मतदानावर बहिष्काराचे इशारेही सुरू असल्याने नगर दक्षिण थंड व शिर्डीत मात्र राजकीय वातावरण गरम, अशी स्थिती झाली आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com