Manoj Jarange News: 'शिंदे-फडणवीसांनी खोटं बोलून डाव साधला, आचारसंहिता संपल्यावर गाठ माझ्याशी...'

Maratha Reservation: तुम्ही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, मग गुन्हे दाखल कसे काय होत आहेत? असा सवाल उपस्थित करीत जरांगेंनी अप्रत्यक्षपणे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil News Sarkarnama
Published on
Updated on

Beed: लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाची (Maratha Reservation) धार कमी झाल्याचे चित्र आहे. सरकारकडून मनोज जरांगेंची (Manoj Jarange) एसआयटी चौकशी करण्यात येत असली तरी जरांगेंचे सरकारवर टीका करणे थांबलेले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करण्याची एकही संधी जरांगे सोडत नाहीत.

बीडचे पालकमंत्री आणि गृहमंत्री मिळून तर खोटे गुन्हे दाखल करत नाहीत ना? अशी शंका जरांगेंनी व्यक्त केली आहे.'आचारसंहिता संपल्यावर गाठ आमच्याशी आहे,' असे म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा दिला आहे. ते बीडच्या परळी येथे संवाद सभेत बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करू, असे आम्हाला सांगितले होते, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी खोटे बोलून डाव साधला, असा आरोप जरांगेंनी केला आहे. तुम्ही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, मग गुन्हे दाखल कसे काय होत आहेत? असा सवाल उपस्थित करीत जरांगेंनी अप्रत्यक्षपणे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. पालक म्हणून तुम्हालाच आम्ही जाब विचारणार, असे मुंडेंचे नाव न घेता जरांगे म्हणाले.

"फडणवीसांना माझ्यासोबत बोलायचं नव्हतं, पण पहाटे तीन वाजता त्यांनी मला फोन केला होता," असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी नुकताच केला आहे. 'आचारसंहिता असेपर्यंत मी कायद्याचं पालन करणार आहे, पण मी शांत बसणार नाही,' असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

Manoj Jarange Patil News
Omraje Nimbalkar: खासदार ओमराजेंचे विरोधकांना प्रत्युत्तर; एका फोनवर मी...

"मराठा समाजाला जाणीवपूर्वक अडचणींत आणण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. मात्र, न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला. ज्या जनतेच्या जिवावर सरकार मोठे झाले तेच नेते आमच्यावर अन्याय करीत आहेत. गुन्हे दाखल करीत आहेत. फडणवीस यांनीच हे सगळं सुरू केलं आहे. माझ्या घराला तर नांदेडपासून नोटीस आली. परंतु मी फुटणार नाही आणि हटणार नाही. मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.

'गृहमंत्री आमच्या विरोधात आकसाने वागत आहेत, माझ्या समाजाविषयी द्वेष व्यक्त होत आहे. त्यामुळे बाकीच्या जाती-धर्माच्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही लढतो आहोत. मात्र, गृहमंत्र्यांचा द्वेष खूप भयंकर आहे,' असा गंभीर आरोप जरांगेंनी केला.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com