VBA Politics : 'शिवसेने'मुळे 'वंचित' आणि 'महाविकास आघाडीत' बिनसले !

Shiv Sena Leader created a dispute : वंचितने संजय राऊत यांनी 'विवेकी' बोलण्याचा दिला सल्ला
Dr. Dhairyavardhan Pundkar, Sanjay Raut
Dr. Dhairyavardhan Pundkar, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

VBA Politics : भाजप, मोदी आणि संघाला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीत येण्यास इच्छूक आहे. चर्चा करण्यास तयार आहे. सीट शेअरींगचा निर्णय महाविकास आघाडी परस्पर घेत असेल आणि वंचित बहुजन आघाडीला बैठकीसाठी बोलविले जाणार नसेल तर वंचित 'बिन बुलाए मेहमान' होणार नाही. असे स्पष्ट संकेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डाॅ.धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज दिले आहे. महाविकास आघाडीची एकतर्फी चाल आणि सुरवातीपासूनच वंचितला वेगळे पाडण्याचा होत असलेला प्रयत्न पाहता वंचितने आज शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भुमिकेचा तीव्र शब्दात समाचार घेतला. इतक्यावरच वंचित नेते थांबले नाही तर त्यांनी महाविकास आघाडीची 27 फेब्रुवारीच्या बैठकीचे वंचितला निमंत्रण नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'विवेकी' बोलण्याचा सल्ला वंचित ने आज दिला. तर मिडियातून संवाद साधु नका असा इशारा देखील वंचितने आज शिवसेना नेत्यांबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे.

महाविकास आघाडीचे 39 जागांवर एकमत झाले असून राज्यातील केवळ 9 जागांचा विषयांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमत होणे बाकी आहे. या राहिलेल्या 9 जागांवर देखील महाविकास आघाडीने एकमत करुन घेत सीट शेअरींग करावी. त्याच बरोबर वंचित ला ज्या जागा पाहिजेत. त्या जागा ज्यांना कोणाला गेल्या त्यांच्यासोबत वंचित चर्चा व निगोसिएशन करण्यास तयार आहे. वंचितला जागा वाटपाच्या चर्चेसाठी आमंत्रणच दिले जात नसल्याची धक्कादायक माहिती राज्य उपाध्यक्ष डाॅ.धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद स्पष्टपणे समोर आले आहे. महाविकास आघाडीत वंचित आहे तर वंचित ला चार पैकी केवळ दोन बैठकांना निमंत्रित कसे केले गेले. 27 फेब्रुवारीच्या बैठकीला वंचितला बैठकीचे निमंत्रण न दिल्याने वंचित नेत्यांनी चांगलीच आगपाखड आज अकोल्यातील पत्रकार परिषदेत केली. बैठकीला बोलवायचे नाही आणि वंचित महाविकास आघाडीत आहे, हे सांगणे कितपत योग्य आहे असा प्रश्नच वंचित चे राज्य उपाध्यक्ष डाॅ.धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला आहे.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr. Dhairyavardhan Pundkar, Sanjay Raut
Sanjay Raut : "आंबेडकरांनुसार जागावाटप जगाच्या इतिहासात कुठंच होत नाही, पण..."

महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यात सीट शेअरींग झाल्याची माहिती माध्यमा मधुनच मिळत असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वंचितला चर्चेपासूनच 'वंचित' ठेवल्याची नाराजी डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे आघाडीच्या बैठकांची आम्हाला माहिती मिळत नाही. कुठल्या मुद्यांवर महाविकास आघाडीत एकमत झाले याची माहिती वंचितला नाही. त्यामुळे महाविकासचा आम्ही घटक असल्याचे आम्हाला वाटत असले तरी महाविकासाच्या बैठकीपासून आम्हाला वंचित ठेवले जात असल्याची खंत डाॅ.पुंडकर यांनी व्यक्त केली आहे.

आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य केले. त्यात त्यांनी वंचित बहुजन आघाडीला प्रत्येक बैठकीला बोलावल्याचे सांगितले. वंचित महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे,असे संजय राऊत वारंवार सांगतात. पण, खासदार संजय राऊत यांनी 'विवेकी' होण्याचा सल्ला वंचित उपाध्यक्ष डाॅ.धैर्यवर्धन पुंडकर यांनी दिली. महाविकास आघाडीच्या चार बैठकांपैकी दोन बैठकींना बोलविण्यात आले. शिवसेना म्हणते महाविकास आघाडीत वंचित घटक आहे. पण, चर्चेत आम्हाला का बोलवत नाही, असा प्रश्न वंचित ने विचारला आहे. आघाडीच्या बैठकीत एका पार्टनर चार चार तास बाहेर बसुन ठेवले जाते. ही कुठली भुमिका महाविकास आघाडीची आहे असा प्रश्नच आज वंचितने उपस्थित केला.

वंचित महाविकास आघाडीसोबत येण्यास तयार असताना महाविकास आघाडीने वंचित नेत्यांना बैठकीपासून दूर का ठेवले ,असा प्रश्न उपस्थित होत आहे. वंचितने वारंवार महाविकास, इंडिया आघाडीत समाविष्ट करण्याची मागणी करत असताना वंचित कडे दूर्लक्ष का केले जात आहे, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.27 फेब्रुवारी रोजीच्या बैठकीत संजय राऊत यांनी बोलावले. आम्ही त्या बैठकीला जाणार आहोत. पण, संजय राऊत हे दिशाभूल करत असल्याचा आरोप वंचित ने केला आहे. 27 फेब्रुवारीच्या तारखेच्या बैठकीचे निमंत्रण आले नाही अशी खळबळजनक माहिती वंचित नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे या बैठकीला जायचे की नाही हा प्रश्न उपस्थित होतो, असे ही डाॅ.पुंडकर यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईडी, सीबीआय ची भिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे नुकतेच भाजप मध्ये गेल्याचा टोला डाॅ. पुंडकर यांनी लगावला. भाजप, मोदी, संघ विरोधात आक्रमक भुमिका वंचित ची आहे. लोकशाही वाचविण्याचा, संविधान वाचविण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करत आहे. पण, महाविकास आघाडीची भुमिका संशयास्पद असल्याचे एकूण चित्र आहे. लोकांमध्ये संशय निर्माण करणाऱ्या भुमिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी घेऊ नये, असे ही डाॅ.पुंडकर यांनी आज महाविकास आघाडीला सुनावले आहे. निवडणुका तोंडावर आहे. अखेर, मिडियातून संवाद थांबविण्याचा इशारा वंचितने महाविकास आघाडीला आज दिला आहे. एकूणच शिवसेनेमुळे आज महाविकास आघाडी आणि वंचित चे बिनसल्याचे चित्र समोर आले आहे.

Dr. Dhairyavardhan Pundkar, Sanjay Raut
Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com