लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर 27 फेब्रुवारीला जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. पण, महाविकास आघाडीचं जागावाटप पहिल्यांदा ठरणार आहे. नंतर तिन्ही पक्षांशी चर्चा करून जागांची मागणी करू, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी घेतली आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ( Sanjay Raut Latest news )
संजय राऊत म्हणाले, "जागावाटपाची चर्चा एकत्र होईल. तीन पक्षांनी जागावाटप करावं आणि नंतर आम्ही हव्या, त्या जागा मागू, अशा प्रकारचे जागावाटप जगाच्या इतिहासात कधी होत नाही. प्रकाश आंबेडकरांना राजकारण आणि भूमिका उत्तम कळतात. प्रकाश आंबेडकरांना हव्या असलेल्या जागा आम्ही देण्यास तयार आहोत. हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"प्रकाश आंबेडकर आणि वंचित महाविकास आघाडीचा घटक आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतात. देशात संविधान वाचवण्याची लढाई सुरू आहे. हे प्रकाश आंबेडकरांइतके कुणाला माहिती नाही. आम्ही सगळे संविधान वाचविण्यासाठी संघर्ष करत आहोत," असं राऊतांनी सांगितलं.
"मोदी-शाहांच्या हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी सर्व राजकीय एकत्र आले आहेत. उत्तर प्रदेशात मायावतींचा मार्ग वेगळा आहे. कारण, त्यांना अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करायची आहे. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी मायावतींच्या मार्गावर जाणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे. घटनेचं आणि लोकशाहीचं रक्षण करून मोदी-शाहांच्या हुकूमशाहीचा पराभव करणं हे आमच्याइतके प्रकाश आंबेडकरांचंही कर्तव्य आहे. 27 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक आहे. त्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला आमंत्रित केलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी बैठकीला येण्याचं मान्य केलं आहे," अशी माहिती राऊतांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.