Sanjay Raut : हरियाणाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती, CM शिंदेंचा दावा राऊतांनी खोडला; म्हणाले, 'काँग्रेस कमजोरच'

Shiv Sena MP Sanjay Raut big comment on assembly elections in Haryana, Jammu-Kashmir and Maharashtra : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हरियाणा आणि जम्मू-काश्मीर निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत मोठ भाष्य केलं आहे.
Sanjay Raut 1
Sanjay Raut 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : सत्तेत भागीदार नको म्हणून, हरियाणात काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना बरोबर घेतले नाही. याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव झाला. 'जो जिता वही सिंकदर', असे म्हणत भाजपचे खासदार संजय राऊत यांनी अभिनंदन केले.

तसंच जम्मू-काश्मीरमधील भाजपच्या पराभवाकडे देखील राऊतांनी लक्ष वेधलं. महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होते. त्यावर लक्ष वेधतानाच, 'तसं काही यांनीच हरियाणात निवडणूक जिंकून दिली. महाराष्ट्र की बात अलग है, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आहेत, शरद पवारसाहेब आहेत. हे एकनाथ शिंदेंनी विसरू नये', असे सल्ला संजय राऊत यांनी दिला.

भाजप हरली आहे

शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "हरियाणा आणि जम्मू-काश्मीर, अशा दोन राज्यांचा निवडणुका होत्या. जम्मू-काश्मीर अत्यंत महत्त्वाचं राज्य होतं. भाजपच्या दृष्टीने तिथली निवडणूक खूप महत्त्वाचं होती. तिथं 370 कलम हटवलं होतं. तो निवडणूक प्रचाराचा भाग होता. तरी देखील नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये 90-90 जागांवर निवडूक होती. हरियाणाचा पराभव दुर्दैवी आहे. इंडिया आघाडीचा विजय जम्मू-काश्मीरमध्ये झाला".

Sanjay Raut 1
Nitesh Rane : नीतेश राणेंची अटक वॉरंटविरोधात धावाधाव, खासदार राऊतांचा बदनामीचा खटला

प्रादेशिक पक्ष गरजेचाच

हरियाणामध्ये इंडिया आघाडी असती, तर परिणाम वेगळा असता, असे सांगून काँग्रेस (Congress) अजूनही कमजोर आहे, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधलं. 'हरियाणात एकतर्फी जिंकू असे वाटले होते. परंतु काँग्रेस जिथं कमजोर असते, तिथं काँग्रेस प्रादेशिक पक्षांची मदत घेते. तसं त्यांचे धोरण असते. हरियाणामधून भाजपचा विजय होईल, असा सांगणारा एकही व्यक्ती मला भेटला नाही. हरियाणामधील पराभव दुर्दैवी आहे. तसंच काँग्रेसला आणि आम्हाला शिकण्यासारखा आहे. देशात निवडणुका एकत्र लढाव्या लागतील. छोटा भाऊ-मोठा भाऊ, असे कोणीही समजू नये. लोकसभेतील यश इंडिया आघाडीचे होते', याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले.

Sanjay Raut 1
Shiv Sena: शिंदे सेनेची पुण्यात माघार; जिल्ह्यात 'या' दोन जागा लढणार

जो जिंकतो वही सिंकदर

महाराष्ट्रात काय होणार, यावर बोलताना संजय राऊत यांनी हरियाणाच्या निकालाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. इथं महाविकास आघाडी आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारखे जागरूक नेते आहे, याकडे राऊतांनी लक्ष वेधले. "भाजपचा हरियाणामधील विजय फार मोठा नाही. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणे शक्य नाही. ठिकठिकाणी अपक्ष उभे करून भाजपने हरियाणात यश मिळवले आहे. पण, 'जो जिंकतो वही सिंकदर'. ही लोकशाही आहे. काँग्रेस निवडणूक आयोगाकडे काही तक्रारी केल्या आहेत, त्याची देखील दखल घेतली पाहिजे. देवेंद्र फडणवीस हरियाणात गेले आणि विजय प्राप्त केला, असं काही झालेलं नाही. काँग्रेसला बहुमतासाठी नऊ जागा कमी पडल्या आहेत. पण काँग्रेसला आता राज्यांच्या निवडणुकांमध्ये वेगळी भूमिका घ्यावी लागले. स्वबळावर लढायचे असेल, तर त्यांनी तशी भूमिका घेतली पाहिजे", असे देखील संजय राऊत यांनी काँग्रेसला सुनावले.

हा महाराष्ट्र आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हरियाणाच्या निकालाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती होईल, असे म्हटलं. यावर खासदार संजय राऊत यांनी चांगलेच फटाकरले. 'तसं हे तिथं जाऊन बसले होते आणि त्यामुळे हरियाणा जिंकली. महाराष्ट्र की बात अलग है. इथं उद्धव ठाकरे आहेत. शरद पवारसाहेब आहेत. महाराष्ट्रात आघाडी आहे. इथं निवडणूक आघाडी म्हणून लढवली जाणार आहे आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, हे विसरता कामा नये', असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com