Sanjay Raut : अजितदादांचा कार्यक्रम 'फिक्स'; संजय राऊतांनी भाजपचं 'राजकारण' सांगितलं

Sanjay Raut big statement on Ajit Pawar political dilemma in the Mahayuti : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महायुतीमधी अजित पवार यांच्या राजकीय कोंडीवर मोठं विधानं केली आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut On BJP : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची महायुतीमधील राजकीय वाटचालीविषयी धोक्याची भविष्यवाणी केली आहे. संजय राऊत यांनी अजित पवारांना महायुतीतून दूर लोटण्यामागचं राजकारण सांगून टाकलं आहे.

"भाजप आणि एकनाथ शिंदे गट एक नंबरचे कपटी लोक आहेत. त्यामुळे अजित पवारांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झाला असून, त्यात शिंदे गटाचे लोक सहभागी आहेत. यात अजित पवारांचा पहिला, तर शिंदे गटाचा दुसरा बळी जाईल", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचे (Shiv Sena) संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. महायुतीमधील धुसफूस सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना महायुतीमधून घेरलं जात असल्याचं समोर येत आहे. अजित पवारांना एकटं पाडलं जात आहे. अडचणीत आणलं जात आहेत. यामागे संजय राऊत यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे राजकारण असल्याचं सांगितलं. या राजकारण भाजप पहिल्यादांचा अजित पवार यांना आणि त्यानंतर एकनाथ शिंदे गटाला संपवेल, असे भाकीत वर्तवलं.

Sanjay Raut
Nitesh Rane : आमदार राणेंच्या अडचणी वाढल्या; सात गुन्ह्यांच्या तपासाला वेग येणार

संजय राऊत म्हणाले, "भाजप आणि एकनाथ शिंदे गट एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी लोक आहेत. आज अजित पवारांचा (Ajit Pawar) काटा काढतील, आणि निवडणुकीनंतर मिंधे गटाचा काटा काढतील. गर्दन उडवतील. ही निर्दयी लोकं आहेत. याचा अनुभव आम्ही घेतलाय. अजित पवारांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झाला असून, त्यात एकनाथ शिंदे गटाचे लोक सहभागी आहेत".

यातले राजकारण सांगताना, अजित पवारांना बाहेर काढल्यास आपपाल्या वाट्याला जास्त जागा लढण्यासाठी येऊ शकतात. पण अजित पवार काकांशी बेईमानी, धोका पत्करून त्यांच्याबरोबर आले आहेत. गरज सरो वैद्य मरो, यापद्धतीनं अजित पवारांना अडचणी आणणारी विधानं, दोन्ही गटाकडून केली जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं.

Sanjay Raut
Dhangar Reservation :'...तर सरकारच्या तोंडावर राजीनामा फेकू', धनगर आरक्षणावर आमदार भडकला

निवडणुकांचा खर्च एकनाथ शिंदे गटावर

'एकनाथ शिंदे गटाचे सरकार 100 टक्के जाणार आहे. 'मविआ'चे सरकार येणार आहे, असा विश्वास व्यक्त करत अशावेळी राज्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या हातात राहू नये, यासाठी भाजपमध्ये हालचाली आताच सुरू झाल्यात. एकनाथ शिंदे यांना दिल्लीने महाराष्ट्राबरोबर हरियाणा आणि झारखंड निवडणुकांचा खर्च करण्यास सांगितलं आहे. यावर त्यांचे मुख्यमंत्रीपद पैशावर टिकून आहेत. हा खर्च केल्यावर, यांना राज्यातील नेतृत्व मिळणार की नाही, याचा विचार भविष्यात दिल्लीकडून होईल. यातूनच महाराष्ट्रात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आणि लुटमार सुरू आहे. या सरकारला यातून दिल्लीला थैल्या द्यावा लागतात. काँग्रेस काळात आम्ही मुंबईतून दिल्लीला जात असलेल्या थैल्या पाहिल्या आहेत. आता गुजरात व्यापरी मंडळाना, या थैल्या पाठवाव्या लागतात. यावर त्यांच्या खुर्च्या टिकून आहेत', असे संजय राऊत यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com