Shambhuraj Desai : शंभुराजे देसाईंनी महायुतीचा 'प्लॅन'च सांगितला; काय आहे एकदा वाचाच...

Shambhuraje Desai On Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या श्रेयाची लढाई सुरू आहे. महायुतीत मात्र भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी लोकसभेतील अपयशावर चिंतन झाले. यातून विधानसभेचा '200 प्लस'चा प्लॅन निश्चित करण्यात आल्याचे शिवसेनेचे शंभुराज देसाई यांनी सांगितले.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaisarkarnama
Published on
Updated on

Shambhuraje Desai News : शिवसेनेचे नेते मंत्री शंभुराजे देसाई यांनी विधानसभेचा मास्टर प्लॅन तयार असल्याचे सांगत महायुती '200 प्लस' जागा लढवणार असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीत लोकसभेच्या श्रेयवादाची लढाई सुरू आहे. विजयानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गैरहजर याचा अर्थ घ्यायचा तो घ्या, असा चिमटा देखील शंभुराजे देसाई यांनी महाविकास आघाडीला काढला.

मंत्री शंभुराजे देसाई यांनी महायुती विधानसभेला कशी समोरे जाणार यावर साम टीव्हीला चर्चा करताना सांगितले. लोकसभा निवडणुकीत महायुतीविरोधात नॅरेटिव्ह तयार करण्यात आला होता. याचा परिणाम महायुतीवर झाला. चुकीच्या नॅरेटिव्हमुळे यश माझे आहे, असे महाविकास आघाडीतील प्रत्येक जण म्हणू लागला आहे. नाना पटोले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारसाहेब हे सर्वच यश आमच्यामुळे आहे, असे म्हणू लागले आहेत. निकालानंतर महाविकास आघाडीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गैरहजर राहतात, याचा काय अर्थ घ्यायचा तो घ्या, असे शंभुराजे देसाई यांनी म्हटले.

Shambhuraj Desai
Atul Save : अतुल सावेंना पालकमंत्री करणार? फडणवीसांचे दोनच शब्दांत उत्तर, म्हणाले...

महाविकास आघाडीवर आम्ही बोलण्यापेक्षा त्यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. एकमेकांवरती कुरघोड्या सुरू आहेत. आम्हाला त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना म्हणून आम्ही त्याच्यावर चिंतन केलेले आहे. काही ठिकाणी आम्ही कमी पडलो, याच अभ्यास पूर्ण झाला आहे. ही चुक आता विधानसभेला शिवसेना (Shiv Sena) करणार नाही, याची खात्री देतो.

Shambhuraj Desai
Sunil Tatkare : तटकरेंना काँग्रेसमधील कोणत्या नेत्यांनी लोकसभेला मदत केली? तटकरेंच्या दाव्यानंतर संशयकल्लोळ!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची चार तास बैठक घेतली. आमच्यातील कमतरतांवर त्यांनी भाष्य केले. चुका कोठे झाल्या हे देखील सांगिले. काय त्रुटी राहिल्या, पुढे काय करायचे, हे लोकसभेमध्ये आम्हाला शिकायला मिळाले आणि कशी दुरुस्ती करायची याचा मास्टर प्लॅन आम्ही तयार केला आहे. महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील त्रुटींवर काम केले आहे. आम्ही आमचं काम करतोय. त्यांच्यात कोण मोठा आणि कोण लहान यावरून वाद सुरू आहे. रस्सीखेच आणि कुरघोड्या त्यांनी करत बसाव्यात. आमचा विधानसभेला महायुतीचा '200 प्लस'चे टार्गेट आहे. तेच ठेवून आम्ही महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला पुढे जाणार आहोत, असेही मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com