Shiv Sena : शिवसेनेचा सरकारी यंत्रणेद्वारे जोरदार प्रचार; राज्याच्या बड्या नेत्याने केली तक्रार

Lok Sabha Election 2024 : यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार रिंगणात आहे. या मतदारसंघात एसटी महामंडळाच्या गाडीवर शिवसेनेचा जोरदार प्रचार सुरू आहे.
S.T.Bus Shiv Sena Campaign
S.T.Bus Shiv Sena Campaign Sarkarnama

Yavatmal Washim Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. पण, अनेक ठिकाणी आचारसंहितेचा खुलेआम भंग होत आहे. त्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. हे दुर्लक्ष जाणीवपूर्वक करण्यात येत आहे की, चुकून होत आहे असा प्रश्न आपसूक विचारला जात आहे.

देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाडीवर शिवसेनेचा धनुष्यबाण गावागावांत पोहाेचविण्याचा प्रयत्न राज्य परिवहन महामंडळाच्या वाशीम आगाराने केला आहे.

वाशीम आगार हे अकोला विभागात येत असून, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर सुरू असलेला हा प्रचार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व अनागोंदी कारभारावर वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः प्रहार केला आहे.

रिसोड येथे प्रचारासाठी जात असताना त्यांना थेट एसटी महामंडळाच्या गाडीवर शिवसेनेच्या चिन्हांचा प्रचार होत असताना दिसले. त्यांनी थेट त्याचा फोटो काढून केंद्रीय निवडणूक आयोगाला त्याची तक्रार केली आहे. सरकारी यंत्रणेद्वारे प्रचार सुरू असल्याचे चित्र यातून स्पष्टपणे समोर आले आहे.

वाशीम मतदारसंघातील काही भाग हा यवतमाळ मतदारसंघात येत असून, तिथे शिवसेना उमेदवार रिंगणात आहे. त्याचे चिन्ह हे धनुष्यबाण आहे. त्यांचा थेट प्रचार एसटीच्या माध्यमातून सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

S.T.Bus Shiv Sena Campaign
Navneet Rana News: 'मोदींची हवा..., या फुग्यात कोणी राहू नका'; राणांची थेट मोदींवरच टीका

आचारसंहिता अंमलबजावणीची जबाबदारी ही जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांची आहे. त्याचबरोबर आचारसंहिता अंमलबजावणीसाठी वेगळी यंत्रणा जिल्ह्याजिल्ह्यात कार्यरत आहे.

त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. असे असताना वारंवार आचारसंहिता भंगचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. आचारसंहितेची भीती अधिकाऱ्यांमध्ये नसल्याचे चित्र आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस निवडणूक निर्णय अधिकारी घेत नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.

त्यामुळे भयमुक्त वातावरणात निवडणुका होत आहेत की नाही, यावर शंका उपस्थित केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत अशा प्रकारे आचारसंहिता भंग होणे गंभीर बाब आहे.

वंचितचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः आचारसंहिता भंगची तक्रार करावी लागली. सरकारी यंत्रणा जर सत्तारूढ शिवसेनेचा प्रचार करत असेल तर मोठी समस्या इतर उमेदवारांसमोर समोर उभी राहू शकते.

यवतमाळ -वाशीम या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्वरित या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. त्याच बरोबर एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकाला त्वरित निलंबित करण्याची गरज आहे.

लोकशाही व्यवस्थेत राज्य सरकार सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत प्रचार करत असेल, तर त्यावर कोण कारवाई करेल, असा प्रश्न विचारला जात आहे. अकोला ते वाशीम प्रवासात खुद्द प्रकाश आंबेडकर यांना एसटी महामंडळ या सरकारी महामंडळाच्या बसेसवर शिवसेनेचे चिन्हं असलेले बॅनर प्रचार करत असल्याचे उघड केले आहे. त्याची तक्रारदेखील त्यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. आता या प्रकरणात कोणावर कारवाई होते हे पाहण्यासारखे असेल.

R

S.T.Bus Shiv Sena Campaign
Shiv Sena News : मुख्यमंत्री शिंदे प्रचाराला गेले अन् मायावतींचे दोन आमदार पक्षात घेऊन आले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com