Shiv Sena News : मुख्यमंत्री शिंदे प्रचाराला गेले अन् मायावतींचे दोन आमदार पक्षात घेऊन आले!

Rajasthan BSP MLA : राजस्थानमध्ये बसपाचे दोन्ही आमदार फोडत शिंदेंनी मायावतींना मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे शिंदे सेना आता राजस्थानातील वाळवंटात धनुष्यबाणची ताकद वाढवण्यास सज्ज झाली आहे.
CM Eknath Shinde with two BSP MLAs
CM Eknath Shinde with two BSP MLAsSarkarnama

Mumbai News : मागील वर्षी राजस्थानमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत एनडीए उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही गेले होते. तिथे भाजपची सत्ता आली अन् साडेचार महिन्यांत शिंदेंना थेट राजस्थानात शिवसेनेची (Shiv Sena News) पाळेमुळे रुजवण्याची संधी मिळाली आहे. बहुजन समाज पक्षातील दोन्ही आमदारांना शिवसेनेत आणत त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत.

राजस्थान (Rajasthan) राज्यातील बसपचे आमदार जसवंत सिंह (Jaswant Singh) आणि मनोज कुमार राठोड (Manoj Kumar Rathod) यांनी काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना सचिव अभिजित अडसूळ, शिवसेना महिला नेत्या मीनाताई कांबळी, प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेनेचे राजस्थान राज्य प्रमुख लाखनसिंह पंवार उपस्थित होते.

CM Eknath Shinde with two BSP MLAs
LokSabha Election News : मुख्यमंत्री शिंदेंनी पहिली लढाई जिंकली; माने, मंडलिकांमध्ये शंभर हत्तींचे बळ...

जसवंत सिंह गुर्जर हे निवडणुकीआधी भाजपमधून (BJP) बसपमध्ये आले होते. त्यांनी बरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला आहे, तर मनोज कुमार यांनी सादुलपूर मतदारसंघात काँग्रेसच्या (Congress) उमेदवार कृष्णा पुनिया यांचा पराभव केला. राजस्थानमधील बसपचे दोन्ही आमदार सेनेत आल्याने मायावतींना मोठा धक्का बसला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रवेशावेळी बोलताना शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, राजस्थान आणि महाराष्ट्र यांचे एकमेकांशी शौर्याचे एक नाते आहे. राजस्थान ही शूरवीर महाराणा प्रताप यांची भूमी आहे, तर महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. त्यांचेच विचार अंगीकारून आमच्या सरकारची वाटचाल सुरू असून, या भूमीतून शिवसेनेमध्ये दोन नवे शिलेदार सामील झाल्यामुळे राजस्थानमधील शिवसेना अधिक बळकट झाली आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी मी स्वतः राजस्थानात एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आलो होतो. तेथील लोकांमध्ये चांगले काम करायला मोठी संधी आहे, वैद्यकीय क्षेत्रात काम केल्यास त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. तसेच शिवसेनेच्या ध्येयधोरणानुसार सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी काम करावे, असेही यासमयी सुचवले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

R

CM Eknath Shinde with two BSP MLAs
Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर, शरद पवारांच्या मल्लाशी भिडणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com