Sanjay Raut : शिक्षा ठोठावल्यानंतर संजय राऊतांचा संताप; जुना मुद्दा काढत थेट सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर घसरले  

Medha Kirit Somaiya Defamation Case Supreme Court Dhananjay Chandrachud : मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात संजय राऊतांना दोषी धरण्यात आले आहे.
Sanjay Raut, Dhananjay Chandrachud
Sanjay Raut, Dhananjay ChandrachudSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी येथील कोर्टाने 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मानहानीच्या खटल्यात सुनावण्यात आलेल्या या शिक्षेनंतर राऊत चांगलेच भडकल्याचे दिसते. त्यांनी थेट न्यायव्यवस्थेवर हल्ला चढवला.

राऊतांनी मीडियाशी बोलताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे बोट दाखवले. जिथे सरन्यायाधीशांच्या घरी मोदक खायला पंतप्रधान मोदी जातात, तिथे आम्हाला काय न्याय मिळणार, असे राऊत यांनी म्हटले आहे. एकीकडे न्यायालयाचा आपण आदर करत असल्याचे सांगताना त्यांनी न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाल्याचा गंभीर आरोपही केला.

Sanjay Raut, Dhananjay Chandrachud
Sanjay Raut : मोठी बातमी : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी; कोर्टाने ठोठावली शिक्षा

मेधा किरीट सोमय्या यांच्यावर राऊतांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याविरोधात सोमय्या यांनी कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला होता. या खटल्यात न्यायालयाने गुरूवारी राऊतांना 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच 25 हजारांचा दंडही ठोठावला. या निकालाविरोधा वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचे राऊतांनी सांगितले.

राऊत म्हणाले, सुरूवातीला आपण भ्रष्टाचाराचे आरोप केले नाहीत. सगळं ऑन रेकॉर्ड आहे. मी केवळ काही प्रश्न उपस्थित केले होते. गैरव्यवहार झाल्याचं मी म्हटलं नव्हतो. कथित भ्रष्टाचारावर विधानसभेत चर्चा झालली होती. आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहित चौकशीची मागणी केली होती. मीरा-भाईंदर महापालिकेचा अहवाल होता. विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केला.

Sanjay Raut, Dhananjay Chandrachud
Hindu Temple Vandalized : हिंदूंनो परत जा! मोदींची पाठ फिरताच अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ला

विधानसभेत या विषयावर प्रश्न विचारले गेले. याची चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली होती. यामध्ये मी मानहानी कुठे केली?. त्याचे पुरावे न्यायालयात दिले होते, असे राऊतांनी सांगितले. मला 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी सत्य बोलणं थांबवणार नाही. जनतेच्या पैशाचा अपहार होत आहे, त्यावर आम्ही काही बोलायचे नाही का? आमदार, खासदार, महापालिका सगळ्यांनी तक्रारी केल्या, पण फासावर संजय राऊतांना फासावर लटकवत आहेत, असा आरोप राऊतांनी केला.

मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तो जनतेच्या हिताचा होता. तो भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना झोंबला. विधानसभेआधी त्यांना मला तुरुंगात टाकायचे आहे. कारण निवडणुका जवळ आल्या आहेत, मी लढायला तयार आहे, असेही राऊत यांनी ठणकावून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com