Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama

Eknath Shinde : पुतळा कोसळल्याप्रकरणी CM शिंदेंचा मोठा निर्णय, नौदलाचे अधिकारी पवन धिंगरांवर 'ही' जबाबदारी

Shivaji maharaj statue collapse Eknath Shinde appointed inquiry committee : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत झालेल्या दुर्घटनेची नेमकी कारण काय? याचा शोध ही समिती लावणार आहे.
Published on

Eknath Shinde News : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर CM एकनाथ शिंदे 'अ‍ॅक्शन मोड'वर आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर या दुर्घटनेच्या संदर्भात चौकशी समिती नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय नौदलाचे तज्ज्ञ कमांडर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव तसेच मुंबई आयआयटीमधील तज्ज्ञांचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत झालेल्या दुर्घटनेची नेमकी कारण काय? याचा शोध ही समिती लावणार आहे. तसेच या दुर्घटनेमागील दोषी निश्चित करणे आदी काम या समितीचे असणार आहे. तांत्रिक समितीने नेमून दिलेले काम करत या समितीला राज्य सरकारला आपला अहवाल सादर करावा लागणार आहे.

Eknath Shinde
Udayanraje On Statue Collapse : उदयनराजेंची पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवर पहिली प्रतिक्रिया; राजकारण करणाऱ्यांना झापलं

पुतळा उभारण्यासाठी समिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा उभारण्यासंदर्भात घोषणा केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीमध्ये सर्वाजनिक बांधकाम विभागाचे सचिव, भारतीय नौदलाचे अधिकारी, आआयटी मुंबईतील प्राध्यापक तसेच इतिहास अभ्यासक यांचा समावेश आहे.

अंबादास दानवेंचे समितीवर सवाल

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत सरकारने नेमलेल्या समितीवर प्रश्नचिन्ह लावले आहे. 'वास्तूविशारद आणि शिल्पकार या दोन भिन्न गोष्टी आहेत. ज्या लोकांचे नाव या समितीमध्ये घेतले आहे, त्या लोकांनी कधी साधा मातीचा गणपती तरी हाताने बनवला आहे का? ते पडलेल्या शिल्पाचा अभ्यास करण्यास पात्र आहेत का?', असा सवाल चौकशी समितीवर दानवे यांनी उपस्थित केला आहे.

Eknath Shinde
PM Modi apologies : पंतप्रधान मोदींनी माफी मागितली पण महाविकास आघाडीचे नेते भडकले, पुतळा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com