एकनाथ शिंदेंच्या आयुष्यात मुख्यमंत्री पदाचा योग आहे का ?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेतील हेवीवेट मंत्री असून त्यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जाते.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे (ShivSena) यांनी काल (मंगळवार) पाचोरा (जिल्हा जळगाव) येथे खासगी दौरा केला. दरम्यान या दौऱ्यात ते पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागात राहणाऱ्या गजानन नामक एका तरुण ज्योतिषाकडे आपला हात दाखवण्यासाठी आले असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. ''आपल्या नशीबात मुख्यमंत्रीपद आहे का नाही,'' हे पाहण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपला हात ज्योतिषाला दाखविला तर नाही ना, अशा तर्कविर्तकांना सध्या उधाण आले आहेत.

शिंदे हे शिवसेनेतील हेवीवेट मंत्री असून त्यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जाते. नुकताच दसरा मेळाव्यात बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मुख्यमंत्री करून दाखवतो असे जाहीर वक्तव्य केले होते, त्यामुळे तर नामदार शिंदे हे आपले नशीब आजमावण्यासाठी भविष्यकाराकडे गेले नव्हते ना ? अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेळी ''शिवसैनिकालाच मी मुख्यमंत्री करणार,'' असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होते. पण महाविकास आघाडी सरकार स्थापनेपूर्वी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ पडली नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली.

खाजगी भेटीवेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जळगाव व पाचोरा येथे काल (ता.१९) झालेल्या गुप्त भेटीने खळबळ उडाली आहे .पाचोरा येथे भेटीच्या वेळी आमदार किशोर पाटील (mla Kishore Patil) यांच्यासह केवळ एक ते दोन जण एवढेच उपस्थित होते. ज्योतिष गजानन यांचे घरी थेट नामदार शिंदे यांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भेट देत चर्चा केली. एका खोलीत फक्त शिंदे व ज्योतिषी दोघांनी सुमारे तासभर चर्चा केली. यानंतर शिंदे यांनी तात्काळ रस्त्या मार्गे पाचोऱ्याहून जळगाव गाठले व तेथून ते मुंबई रवाना झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Eknath Shinde
सत्तेसाठी 'जय शिवाजी, जय भवानी'च्या खोट्या घोषणा ; भाजपचे टीकास्त्र

शिंदे हे शिवसेनेतील हेवीवेट मंत्री असून त्यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जाते. नुकताच दसरा मेळाव्यात बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मुख्यमंत्री करून दाखवतो असे जाहीर वक्तव्य केले होते, त्यामुळे तर नामदार शिंदे हे आपले नशीब आजमावण्यासाठी भविष्यकाराकडे गेले नव्हते ना ? अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

Eknath Shinde
आर्यन खानची NCBकडे विनंती ; चूक सुधारण्याची संधी द्या!

या भेटीबाबत शिवसेनेकडून गुप्तता पाळण्यात आली होती, शिंदेंनी पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांनी घरी बैठक घेतली. महापालिकेत बदलेल्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतल्याचे समजते. पाचोरा येथून जळगाव येथे परत येताना त्यांनी जैन हिल्स येथे भेट दिली त्या ठिकाणी भोजन घेतले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी नगरसेवक अमर जैन उपस्थित होते. तेथून ते विमानतळाकडे रवाना झाले व तातडीने मुंबईला रवाना झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com