शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या घरी आज लगीनघाई !

दोन्ही कुटुबियांच्या घरी लग्नाची सध्या लगबग सुरु आहे. या विवाहासाठी आघाडी सरकारमधील नेते, मंत्री, विविध पक्षातील राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.
विक्रम-प्रेरणा, पूर्वशी-मल्हार
विक्रम-प्रेरणा, पूर्वशी-मल्हार सरकारनामा

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या घरी आज लगीनघाई सुरु आहे. सनई चौघाड्यांचे सूर घुमू लागले आहेत. या सोहळ्यासाठी विविध मंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दोन्ही घरी लग्नाची सध्या लगबग सुरु आहे. या विवाहासाठी आघाडी सरकारमधील नेते, मंत्री, विविध पक्षातील राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (sanjay raut) यांची कन्या पूर्वशी (Purvashi) हीचा विवाह ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे पुत्र मल्हार (Mahlar)यांच्यासोबत होत आहेत. मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सायन इथे त्यांचं ऑफिस आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे आक्रमक नेते, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांचा विवाह चोपडा तालुक्यातील सनफुले गावातील शेतकरी भगवान भिका पाटील यांची सुकन्या प्रेरणा हिच्यासोबत सोबत होत आहे.

मंत्र्यांचा मुलगा आणि शेतकरी कुटुंबातील सून असा विवाह आज साध्या पद्धतीनं होत आहे. शेतकऱ्याची कन्या मंत्र्याची सून होणार, अशी चर्चा सध्या जळगाव जिल्ह्यात सुरु आहे.

राऊत यांची कन्या पूर्वशीच्या लग्नाआधी रविवारी मंगल विधी, संगीत कार्यक्रम पवईतील एका सप्ततारांकित हॉटेलमध्ये झाला, या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

विक्रम-प्रेरणा, पूर्वशी-मल्हार
सातारा बॅकेच्या अध्यक्षपदी शिवेंद्रराजे की नितीन पाटील ; तर्कविर्तकांना उधाण

सध्या पूर्वशी-मल्हार यांचा हळदी समारंभ, संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. मात्र, सध्या राऊत यांच्या कन्येची लग्नपत्रिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पत्रिकेवरील #PMkiShaadi (पीएम की शादी) हा हॅशटॅग सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ही लग्नपत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

लग्न पत्रिकेमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचे इंग्रजीत नाव आहे. पूर्वशी (Purvashi) या इंग्रीजी नावातील पी (P) तसेच मल्हार (Mahlar) या नावातील एम (M) या अक्षरांना घेऊन हॅशटॅग तयार करण्यात आला आहे. या दोन्ही नावांच्या आद्यक्षरांना घेऊन लग्नपत्रिकेवर #PMkiShaadi असे छापण्यात आले आहे. त्यामुळे हा हॅशटॅग चर्चेचा विषय ठरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com