Sanjay Gaikwad News: एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराकडून भाजपची कोंडी; म्हणाले,''आमच्याकडे गुजरातची...''

Maharashtra Politics : अजित पवार राष्ट्रवादीचा गट भाजपसोबत...
 Eknath Shinde| Devendra Fadanvis
Eknath Shinde| Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Buldhana : अजित पवारांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांवरुन मागील दोन तीन दिवसांपासून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. अजितदादांनी स्पष्टीकरण देऊनही या चर्चा अद्याप थांबलेल्या नाहीत. आणि विशेष म्हणजे अजित पवार आणि राष्ट्रवादीतील घडामोडींवर भाजपकडून सावध भूमिका घेतली जात असताना एकनाथ शिंदेंचे शिलेदारच अजित पवारांना महायुतीत घेण्यासाठी आग्रही भूमिकेत असल्याचं दिसत आहे.

आता शिवसेनेचे नेते व शिंदेंचे शिलेदार आमदार संजय गायकवाड(Sanjay Gaikwad) यांनी केलेल्या विधानामुळे भाजपसह मुख्यमंत्री शिंदेंचीही मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 Eknath Shinde| Devendra Fadanvis
Prakash Ambedkar News : सोळा आमदार अपात्र होणार का?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

बुलडाण्याचे शिवसेना आमदार शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अजित पवारांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांवर सूचक वक्तव्य केलं आहे. या विधानावरुन राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादीचा गट भाजपसोबत आणत नव्हते, तर थेट त्यांच्या भाजपप्रवेशाचीच चर्चा सुरु होती, असा दावा संजय गायकवाड यांनी केलाय. तसेच आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर असल्याचं देखील गायकवाड यावेळी म्हणाले.

आमदार संजय गायकवाड म्हणाले की, जी चर्चा सुरू होती, ती अजित पवारांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा होती. आमच्याकडे गुजरातची पावडर नाहीये का, तुम्हाला माहिती नाही का? असं हसत हसत बोलत आमदार संजय गायकवाड मिश्किलपणे हसले आणि म्हणाले, आता त्या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला आहे. पण याच विधानाचा धागा पकडून महाविकास आघाडीचे नेतेमंडळींकडून भाजप आणि शिंदे गटाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.

 Eknath Shinde| Devendra Fadanvis
Karnataka Election : भाजपच्या तावडे-शेलारांकडे आयटी हब असलेल्या बंगळुरूची जबाबदारी; 'हे' आहे कारण

विरोधकांकडून सातत्यानं केंद्रातील मोदी सरकारकडून केंद्रीय तपासयंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याची टीका केली जाते. तसेच या तपासयंत्रणांचा चौकशी ससेमिरा पाठीमागे लावत विरोधकांवर दबाव आणला जात आहे.मात्र, भाजपप्रवेश केला की, संबंधित नेत्यांची चौकशीचा फेरा टळतो तसेच त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप देखील विरोधक करत असतात.

एकीकडे भाजप नेते तपासयंत्रणा स्वायत्त आहेत. पण दुसरीकडे त्यांचेच नेते भाजपात गेल्यावर भ्रष्टाचाराचे सारे डाग निरमा पावडरनं धुतले जातात हे जाहीरपणे सांगायला घाबरत नाहीत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com