Simi Garewal: रावण दहनाचं कुठलंही हार्ड फिलिंग नाही! संसदेतल्या अर्ध्या लोकांपेक्षा तू...; अभिनेत्री सिमी गरेवाल यांचं रावणाला पत्र

Simi Garewal: रावण वाईट होता म्हणून त्याचं दहन केलं जातं पण रावणापेक्षा आजचं राजकारण अतिशय वाईट असल्याचं अभिनेत्रीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Simi Garewal
Simi Garewal
Published on
Updated on

Simi Garewal writes letter to Ravana: विजयादशमीचा उत्सव आज देशभरात साजरा केला जात आहे. यानिमित्त वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून रावणाचा पुतळा जाळण्याची प्रथा आहे. पण या पौराणिक रावणापेक्षा संसदेत बसलेले आजचे लोकप्रतिनिधी हे अधिक वाईट आहेत, अशा आशयाचं एक काल्पनिक पत्र ज्येष्ठ अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअरही केलं आहे. त्यांच्या या पत्राची सध्या सर्वत्र चर्चा सुरु असून अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे तर काहींनी ट्रोलही केलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या गरेवाल?

प्रिय रावण...

दरवर्षी, या दिवशी आपण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो. पण, तांत्रिकदृष्ट्या तुझे वर्तन 'वाईट' वरून 'थोडेसे खोडकर' असे पुन्हा वर्गीकृत केले पाहिजे.

शेवटी, तुमने किया ही क्या था? मी सहमत आहे की तू घाईघाईत एका महिलेचं अपहरण केलं. पण, त्यानंतर..तू तिला आजच्या जगात महिलांना मिळतो त्यापेक्षा जास्त आदर दिला. तू तिला चांगले अन्न, आश्रय आणि महिला सुरक्षा रक्षक देखील दिले (तू तेवढा सुंदर दिसत नव्हतास).

लग्नाची तुझी विनंती नम्रतेने भरलेली होती आणि ही विनंती नाकारल्यावर तू कधीही तिच्यावर अ‍ॅसिड फेकले नाही. भगवान रामाने तुला मारलं तेव्हाही, तू त्यांची माफी मागण्याइतका शहाणा होतास.

उलट.. मला वाटतं की तू आमच्या संसदेच्या अर्ध्या लोकांपेक्षा जास्त शिक्षित होतास.

माझ्यावर विश्वास ठेव मित्रा, तुला जाळण्यासाठी माझ्या मनात कोणतीही कठोर भावना नाही.

पण मी सांगितलं तेच खरं आहे.

दसऱ्याच्या शुभेच्छा

कमेंट्समधून संमिश्र प्रतिसाद

दरम्यान, सिमी गरेवाल यांच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. काही लोकांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. तर काहींनी त्यांना जाब विचारत ट्रोलही केलं आहे. एका युजरनं ही खूपच क्रिएटिव्ह पोस्ट असल्याचं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एकानं तुम्ही अपहरणाचं समर्थन कसं काय करता? तुमचंच कधी अपहरण झालं तर तुम्हाला कळेल. रावणानंच तुमचं अपहरण केलं तर तुमच्यातला सगळा रोमान्य संपून जाईल.

एका महिला युजरनं म्हटलं की, रावणानं सीतेचं अपहरण करणं हा खोडकरपणा नव्हता तर रंभा आणि वेदवती यांच्याशी रावणानं गैरवर्तन केलं ते तुम्ही विसरात का? तसंच सीतेच्या अपहरणापूर्वी त्यानं कुबेराच्या पत्नीशीही दुश्षकर्म केलं होतं, हे तुम्ही विसरलात का? तर रावण हा बलात्कारी होता असं वाल्मिकी रामायणात म्हटलं आहे, याचंही तुम्हाला काहीच हार्ड फिलिंग वाटत नाही का? असंही एका युजरनं म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com