SIR form verification Status : SIR फॉर्म भरलात, आता पुढे काय? तुमचे सबमिशन झाले की नाही; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

What to do after submitting SIR form : SIR फॉर्म भरल्यानंतर तुमचे सबमिशन यशस्वी झाले की नाही हे ऑनलाइन कसे तपासायचे? स्टेप बाय स्टेप प्रक्रिया, स्टेटस तपासण्याची संपूर्ण माहिती आणि महत्त्वाच्या सूचना जाणून घ्या.
SIR From submission status
SIR From submission statusSarkarnama
Published on
Updated on

राज्यासह देशभरात सध्या SIR 2026 मोहीम सुरू असून मतदारांकडून मोठ्या प्रमाणावर फॉर्म भरले जात आहेत. या प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट 2026 असल्याने अनेक नागरिक ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने फॉर्म सादर करत आहेत. मात्र फॉर्म भरल्यानंतर तो यशस्वीरीत्या सबमिट झाला आहे की नाही, याची खात्री करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

अनेक मतदारांनी फॉर्म भरून प्रक्रिया पूर्ण केली असली तरी अर्जाची सद्यस्थिती कशी तपासायची, याबाबत अनेकांना संभ्रम आहे. प्रत्यक्षात ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे भरलेल्या फॉर्मचे स्टेटस तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे काही सोप्या टप्प्यांद्वारे तुम्ही तुमचा अर्ज यशस्वीरीत्या नोंद झाला आहे की नाही, हे सहज पाहू शकता.

SIR From submission status
SIR Form Online : स्मार्टफोनवरून अवघ्या 5 मिनिटांत भरा SIR फॉर्म; 8 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा प्रक्रिया, जाणून घ्या सोपी पद्धत

पहिल्यांदा संबंधित पोर्टलवर लॉगिन करावे. ज्यांचे खाते आधीपासून तयार आहे, त्यांना लॉगिन केल्यानंतर त्यांचे नाव दिसेल. ज्यांनी अद्याप खाते तयार केलेले नाही, त्यांनी प्रथम साइन अप करून लॉगिन करणे आवश्यक आहे.

लॉगिन झाल्यानंतर "Fill Enumeration Form" या पर्यायावर क्लिक करावे. पुढील स्क्रीनवर राज्य निवडण्याचा पर्याय दिसेल. त्यामध्ये आपले राज्य निवडल्यानंतर मतदार ओळखपत्रावरील EPIC क्रमांक टाकून शोध घ्यावा.

यानंतर संबंधित मतदाराची माहिती स्क्रीनवर दिसेल. काही प्रकरणांमध्ये नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागतो. त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. OTP पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अर्जाची संपूर्ण माहिती दिसते. त्याचबरोबर खाली हिरव्या अक्षरात फॉर्म यशस्वीरीत्या सबमिट झाल्याचा संदेशही दिसतो.

SIR From submission status
Abhijeet Dipke BJP Offer Allegation : 'भाजपकडून ऑफर, नकार दिल्यास धमकी' दिपकेंचा दावा; 'नावं जाहीर करा' म्हणत राधाकृष्ण विखेंचे आव्हान

काही मतदारांच्या बाबतीत OTP पडताळणीची आवश्यकता नसते. अशावेळी केवळ EPIC क्रमांक टाकल्यानंतरच अर्जाची स्थिती स्क्रीनवर दाखवली जाते. जर तेथे तुमचा फॉर्म सबमिट झाल्याचा संदेश दिसत असेल, तर तुमचा अर्ज यशस्वीरीत्या स्वीकारला गेला आहे, असे समजावे.

त्यामुळे SIR फॉर्म भरल्यानंतर त्याचे स्टेटस एकदा नक्की तपासा. यामुळे अर्ज व्यवस्थित सादर झाला आहे की नाही, याची खात्री होईल आणि पुढील कोणतीही अडचण टाळता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com