

How to fill SIR form online : मतदार यादीच्या Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी करायची असल्यास आता ती थेट स्मार्टफोनवरून करता येते. 8 ऑगस्ट 2026 ही नोंदणीची अंतिम तारीख असून, या कालावधीत अर्ज न भरल्यास काही प्रकरणांमध्ये मतदार यादीतील नोंदीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळ न दवडता अर्ज पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम मोबाईलमधील Google Play Store वर जाऊन ECINet हे Election Commission of India चे अधिकृत अॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करा. अॅप सुरू केल्यानंतर आवश्यक परवानग्या द्या आणि पुढील प्रक्रिया सुरू करा.
यानंतर "Search Your Name in Last SIR" या पर्यायातून राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ निवडून 2002 च्या SIR यादीमध्ये तुमचे नाव शोधा. जर स्वतःचे नाव सापडले नाही, तर आई, वडील, आजी किंवा आजोबा यांच्यापैकी कोणाचेही नाव तपासा. नाव मिळाल्यास त्याचा स्क्रीनशॉट जतन करून ठेवा, कारण पुढील टप्प्यात त्याची आवश्यकता लागू शकते.
"Voter Registration Forms" विभागात जाऊन "Special Intensive Revision – Fill Enumeration Form Online" हा पर्याय निवडा. आधीपासून खाते असल्यास मोबाईल क्रमांक आणि OTP च्या मदतीने लॉगिन करा. नवीन वापरकर्त्यांनी प्रथम नोंदणी पूर्ण करून पुन्हा फॉर्म विभागात प्रवेश करावा.
फॉर्म भरताना महाराष्ट्र राज्य निवडा आणि मतदान ओळखपत्रावरील EPIC क्रमांक टाकून माहिती शोधा. सर्व तपशील नीट तपासल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करा. अर्ज भरण्यापूर्वी दोन बाबींची खात्री करणे आवश्यक आहे. आधार कार्डवरील इंग्रजी नाव आणि मतदान कार्डवरील इंग्रजी नाव पूर्णपणे जुळले पाहिजे. तसेच मतदान कार्डाशी मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे. मोबाईल क्रमांक लिंक नसल्यास आधी तो अपडेट करावा.
त्यानंतर SIR फॉर्ममध्ये उपलब्ध असलेल्या चार पर्यायांपैकी तुमच्या परिस्थितीनुसार योग्य पर्याय निवडा. आवश्यक असल्यास नातेवाईकांची मतदार माहिती, वैयक्तिक तपशील, जन्मतारीख, पालकांची माहिती आणि इतर आवश्यक माहिती भरा. त्यानंतर नवीन पासपोर्ट आकाराचा JPG फोटो अपलोड करा.
फॉर्म सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा तपासा, घोषणा स्वीकारा आणि आधार OTP द्वारे e-Sign प्रक्रिया पूर्ण करा. अर्ज यशस्वीपणे जमा झाल्यानंतर मिळणारा Reference ID चा स्क्रीनशॉट जतन करून ठेवा. शक्य असल्यास तो तुमच्या BLO ला WhatsApp वर पाठवा. त्यानंतर EPIC क्रमांक टाकून अर्जाची स्थिती तपासता येईल.
"जर ऑनलाइन फॉर्म भरताना कोणतीही तांत्रिक अडचण आली, नाव जुळत नसेल किंवा OTP संबंधित समस्या येत असतील, तर वेळ वाया घालवू नका. थेट तुमच्या BLOशी संपर्क साधा आणि ऑफलाइन फॉर्म जमा करा."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.