Eknath Shinde on Thackeray : ''...म्हणून कर्नाटकला प्रचाराला आलो!''; ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Karnataka Election : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मईची भांडी घासायला कर्नाटकात जात आहेत अशी टीका उध्दव ठाकरेंनी केली होती.
EKnath Shinde Uddhav Thackeray
EKnath Shinde Uddhav ThackeraySarkarnama

Eknath Shinde Reply To Uddhav Thackeray : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी(दि.६) महाडच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. तसेच त्यांनी या सभेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मईची भांडी घासायला कर्नाटकात जात आहेत. त्यांना लाज वाटायला पाहिजे, बोंबलून झालं असेल. हिंमत असेल तर मिंध्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला हारवा असं आवाहन लोकांना करायला पाहिजे असा हल्लाबोल केला होता. त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde)यांनी कर्नाटक प्रचारादरम्यान माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे म्हणाले, ''मी भाजप शिवसेना युतीचा प्रचार करण्यासाठी कर्नाटकला आलो आहे. केंद्र आणि राज्यातही जसं समविचारी पक्षांचं भाजपचं डबल इंजिनचं सरकार वेगवान पध्दतीनं काम करतं आहे.

महाराष्ट्रात जसं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचं समविचारी सरकार आहे आणि कर्नाटकातही समविचारी सरकार आहे. तसंच कर्नाटकमध्येही डबल इंजिन सरकार यावं यासाठी मुद्दाम कर्नाटक दौऱ्यावर आलो असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधान मोदींच्या रोड शोला लाखोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. कर्नाटक निवडणूक भाजप मोठ्या बहुमतानं जिंकणार असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला.

EKnath Shinde Uddhav Thackeray
Karnataka Election 2023 : राहुल गांधींबाबत सोनिया चिंतीत ; त्यांची गॅरंटी कोण घेणार ? ; भाजपचा मिश्किल सवाल

मुख्यमंत्र्यांचा कर्नाटक दौरा...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह प्रचारासाठी रिंगणात उतरणार आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही काँग्रेसच्या बाजूनं जोरदार प्रचार करताना दिसणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुक्काम ठोकून आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता कर्नाटकात दाखल झाले आहेत. शिंदे भाजप उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कर्नाटक दौऱ्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

...त्यांची जाहिरात कन्नडमध्ये येते...

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी कालच्या महाडच्या सभेत शिंदे यांच्यावर घणाघाती टीका करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मईची भांडी घासायला कर्नाटकात जात आहेत असं म्हटलं. तसेच लाज वाटायला पाहिजे, बोंबलून झालं असेल. हिंमत असेल तर मिंद्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला हारवा असे आवाहन लोकांना करायला पाहिजे. मात्र त्यांची जाहिरात कन्नडमध्ये येते असं म्हटलं होतं. उध्दव ठाकरेंनी कर्नाटकमध्ये सभा घेऊन दाखवावी..!

EKnath Shinde Uddhav Thackeray
Sharad Pawar Stand About Barsu : 'बारसूच्या लोकांना विश्वासात घ्यायला हवे, तेथील लोकांना भेटण्याची इच्छा,' ; शरद पवारांंची भूमिका!

उध्दव ठाकरे काय म्हणाले?

शिवसेना नेते संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरे यांना वेळ असेल तर त्यांनी कर्नाटकमध्ये जावे दुसऱ्याला शहाणपण शिकू नये, तुम्हाला सभा घ्यायला कोणी रोखले आहे. संजय राऊतसारख्या तीन पाट माणसाला पाठवता आणि इथे बसून त्याच्यावर कॉमेंट करताय. उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी कर्नाटकमध्ये सभा घेऊन दाखवावी असं आवाहन केलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com