Sharad Pawar Stand About Barsu : 'बारसूच्या लोकांना विश्वासात घ्यायला हवे, तेथील लोकांना भेटण्याची इच्छा,' ; शरद पवारांंची भूमिका!

Sharad Pawar NCp News : 'बळाचा वापर करून प्रकल्प रेटू नये.."
Sharad Pawar Stand About Barsu :
Sharad Pawar Stand About Barsu : Sarkarnama

Sharad Pawar Stand About Barsu : कोकणात सध्या रिफायनरी प्रकल्पावरून सुरू असलेला वाद पेटला आहे. राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव या परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्पावरून सध्या राजकीय रणकंदन सुरू आहे. स्थानिकांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष 'बारसू' प्रकल्पाकडे लागले आहे.

Sharad Pawar Stand About Barsu :
Ujwal Nikam on Supreme Court Judgment: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांच्या निकालाबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे भाष्य

बारसू प्रकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी बारसू प्रकल्पाबाबत केलेल्या विरोधाबाबत मला माहिती नाही. पण जर आज त्यांना बारसूमधील सर्वसामान्य लोकांच्या तीव्र भावना लक्षात आल्या असतील. पर्यावरणावर त्याचा विपरित परिणाम होईल, अशीही भूमिका समोर येत आहे. तेथील काही गोष्टींना ऐतिहासिक महत्त्व आहे. ही माहिती त्यांच्यासमोर मांडल्याच्या नंतर, त्यांनी काही भूमिका घणे त्याच्यात काही चूक नाही."

शरद पवार पुढे म्हणाले, "ते सांगतात काय? दुसरा निर्णय घ्या, पण स्थानिक लोकांना दुर्लक्षित करून, त्यांचा विश्वास संपादित न करता, बळाचा वापर करून प्रकल्प करू नका, त्याचं मत योग्य आहे. लोकांसोबत चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे," असे म्हणत त्यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.

Sharad Pawar Stand About Barsu :
Chhatrapati Sambhajinagar Loksabha News : भुमरे, शिरसाटांना दिल्लीचे वेध का ? लोकसभा लढवण्यासाठी दोघेही तयार..

"बारसूतील काही स्थानिक लोकांशी माझी एक बैठक झाली. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन, राज्य सरकारच्या प्रतिनिधींना घेऊन, स्थानिक लोकांच्या पुढे जावं, असं मला वाटतं. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि रत्नागिरी जिल्ह्यातले अधिकारी यांची संयुक्त चर्चा माझ्याकडे झाली. त्यांनी त्यांची मते सांगितली. मी काही प्रश्न उपस्थित केले. यावर पुन्हा आम्ही चर्चा करणार आहोत," असे ही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com