
मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात चर्चा तसेच आपल्या मंत्र्यांची यादी ते फडणवीसांकडे सोपवणार असल्याची चर्चा आहे.
सुनेत्रा पवार यांचा दिल्लीतील पत्ता 11 जनपथ असणार आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या अगदी जवळच सुनेत्रा पवार यांचे घर आहे.शरद पवार यांच घर म्हणजे 6 जनपथ आहे. शरद पवार यांच्या घरापासून काही पावलांच्या अंतरावर सुनेत्रा पवार यांचे नवं निवासस्थान आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अजुनही याबाबतच्या हालचाली दिसून येत नाहीत. साम टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार मंत्रिमंडळाचा विस्तार 15 डिसेंबरला होणार असून या दिवशी मंत्रिपदाची शपथ महायुतीमधील नेते घेणार आहेत. अजितदादांच्या वाट्याला 10 मंत्रिपदे तर एकनाथ शिंदेंच्या वाट्याला 12 मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा कालावधी मिळणार आहे. मंत्र्यांचा पहिल्या अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर दूसऱ्या आमदारांना पुढील अडीच वर्षाचा कालावधी मंत्रिपदासाठी मिळणार असल्याचे ठरले आहे, यावरुन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे, शिवसेनेच्या मंत्र्यांनी तीन शिफ्टमध्ये काम करावे, असा खोचक सल्ला दानवेंनी दिला आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेच्या अनेक माजी मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे माजी मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. पहिल्या यादीत अनेकांची नाव नसल्याचे माहिती आहे. तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, संजय राठोड, अशा अनेकांना धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकनाथ शिंदे
उदय सामंत
शंभूराजे देसाई
गुलाबराव पाटील
दादा भुसे
प्रताप सरनाईक
संजय शिरसाठ
भरत गोगावले
आशिष जयस्वाल
योगेश कदम
विजय शिवतारे
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत भाजपच मोठा भाऊ ठरला आहे. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या (शनिवारी) होत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा कालावधी मिळणार आहे. मंत्र्यांचा पहिल्या अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर दूसऱ्या आमदारांना पुढील अडीच वर्षाचा कालावधी मंत्रिपदासाठी मिळणार असल्याचे ठरले आहे, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी हा अडीच वर्षांचा फॅार्मुला असल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिवसेनेच्या सर्वाधिक आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ गळ्यात पडणार असल्याचे चित्र आहे.
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधीची तारीख फायनल झाली आहे. उद्या (ता. 14) राजभवनात दुपारी 12 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. यासाठी राजभवनात तयारी सुरु आहे. उद्या (शनिवारी) 15 ते 20 मंत्र्यांचा शपथविधी होईल, अशी माहिती सुत्रांना दिली आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे ५-५ मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते. तर भाजपचे सर्वाधिक म्हणजे ८ ते १० आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
विमान कंपन्या आणि शाळांना धमकीचे मेल येत असताना आता थेट रिझर्व्ह बँकेला धमकीचा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. रिझर्व्ह बँकेला स्फोटकांनी उडवून देणारा अशा धमकीचा मेल RBI गव्हर्नर यांना मेलवरुन ही धमकी देण्यात आली आहे. रशियन भाषेत हा मेल आहे. धमकीनंतर मुंबई पोलीस तपासाला लागले आहे. याप्रकरणी एम आर ए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षीत यश मिळाले नाही, त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस पक्षसंघटनेतील नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. याबाबत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला यांनी 14 खासदारांशी दिल्लीत चर्चा केल्याची माहिती आहे. 17 डिसेंबरला नागपुरात विधानसभा, विधान परिषदेच्या आमदारांसोबत तसेच पराभूत उमेदवारांसोबत प्रत्यक्ष चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. निवडणुकीमध्ये नेमकं काय चुकलं, पक्ष एकजूट राहिला का? नेत्याचा समन्वय होता का? यासह विविध प्रश्नांची माहिती पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. याचा अहवाल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देणार आहे.
बैठकीत प्रदेशाध्यक्ष, आणि मुंबई अध्यक्ष बदलला गेला पाहिजे का? या संदर्भातही चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यशैलाबाबत पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज असल्याच्या तक्रारी आहे. काही महिन्यापूर्वी मुंबईतील 16 नेत्यांनी वर्षा गायकवाड यांना बदलण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यांच्या कार्यशैलीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पक्षाचे काम करण्यास गायकवाड यांच्याकडे वेळ नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
आजपासून संसदेमध्ये 4 दिवस संविधानावर विशेष चर्चा होणार आहे. आज आणि उद्या लोकसभेत तर सोमवार आणि मंगळवारी राज्यसभेत या विषयावर चर्चा होईल.लोकसभेतील चर्चेची सुरुवात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार आहेत. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी चर्चेची सुरुवात करण्याची शक्यता आहे. लोकसभेत NDA चे घटकपक्ष असलेल्या शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे, JDS कडून कुमारस्वामी चर्चेत सहभागी होतील. संविधानावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लोकसभेत उत्तर देणार आहेत. गृहमंत्री अमित शहा राज्यसभेत संविधानावरील चर्चेला सुरुवात करणार आहेत. संविधानाच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त सभागृहात चर्चा ही विशेष चर्चा होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.