Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकींचा कधीही बिगूल वाजणार; निवडणूक आयोग राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार

The Chief Officer of the Election Commission will review the preparations for the assembly elections from the District Collectors : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून 13 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात विधानसभा निवडणुकींचा कधीही बिगूल वाजू शकतो. निवडणूक आयोगाकडून, तशा हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक तयारीचा आढावा राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी 13 सप्टेंबरला घेतील. निवडणूक आयोगाच्या या वेगवान हालचालीमुळं सर्व राजकीय पक्ष, संघटना देखील अलर्ट झाल्या आहेत.

केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा नुकताच मुंबई दौरा झाला. या दौऱ्यात महायुतीतील प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली. महायुतीत पुढील काही दिवसांत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसंच महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. इतर छोट्या-मोठ्या संघटना आणि राजकीय पक्ष आपपाल्या मतदारसंघात ताकद वाढवण्यात गुंग आहे. यातच राज्य मुख्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे. त्यामुळे राज्यात कधीही विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजू शकतो, असं वातावरण निर्माण झालं आहे.

Election Commission
BMC Clerk Recruitment : आदित्य ठाकरेंच्या आंदोलनाला मोठं यश; 'बीएमसी' एक पाऊल मागे, लिपिक भरतीसाठीची 'ती' अट अखेर रद्द

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी 13 सप्टेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणुकीच्या (Election) तयारीचा आढावा घेणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम वेगवेगळ्या विभागांमधील जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेणार आहे. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नाशिक, पुणे, कोकण, मुंबई शहर आणि उपनगरचा दिवसभर आढावा घेणार आहेत. दूरदृश्यप्रणालीद्वारे हा आढावा घेतला जाणार आहे.

Election Commission
Shivsena UBT News : ठाकरेंनी शब्द फिरवला, माजी आमदाराचा पक्षाला जय महाराष्ट्र..

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय हा आढावा असणार आहे. ईव्हीएम मशीन, मतदान कर्मचारी, कायदा आणि सुव्यवस्था, मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्त, मतदान केंद्र, बूथ केंद्राचा प्रस्ताव, मतदार यादी, नियंत्रण कक्ष, माध्यम कक्ष, नोडल अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण, तक्रार निवारण, निवडणूक आयोगाने मतदारांसाठी उपलब्ध करून दिलेले 'अॅप'ची स्थिती, वाहतूक व्यवस्था, टपाल मतदान प्रक्रिया आदींचा आढावा यात घेतला जाणार आहे.

बोगस मतदारांच्या तक्रारींचा आढावा

लोकसभा निवडणुकीला मतदार याद्यांबाबत अनेक तक्रारी झाल्यात. मतदार याद्यांमध्ये बोगस मतदार घुसवण्यात आल्याच्या या तक्रारी आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी या तक्रारी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत निवडणूक आयोगाकडे केल्यात. या तक्रारी पुराव्यानिशी आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी याचा देखील आढावा घेणार असल्याचे सांगितलं जात आहे.

'ईव्हीएम' मशीन तपासणी

राज्यात एक लाखांपेक्षा अधिक मतदान केंद्र असणार आहेत. मतदानासाठी ईव्हीएम वापरल्या जातील. त्यांची तांत्रिक तपासणी आणि त्या मतदानासाठी योग्य असल्याची खात्री तज्ज्ञ अभियंत्यांकडून करून घेतली जाणार आहे. ही प्रक्रिया राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थित होते. त्याचा आढावा देखील मुख्य अधिकारी घेतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com