
Budget Session 2025 : औरंगजेब कबर, नागपूरची दंगलस छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे राहूल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, बीड जिल्ह्यातील खोक्याचे प्रकरण आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणामुळे महाराष्ट्रातील वातवारण ढवळून निघाले आहे.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही जनतेच्या प्रश्नावर चर्चा होण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना सरकारवर टीका केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा या स्टॅंडअप काॅमेडियन स्टारने विडंबनात्मक गाणे तयार केले आणि त्यावरून गेल्या दोन दिवसापासून एकच गदारोळ सुरू आहे. तीन वर्षापुर्वी शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यामागचे सूत्रधार यांना डिवचण्याचा प्रयत्न कामरा यांच्या गाण्यातून झाला.
त्यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून उमटलेले हिंसक पडसाद या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हे सरकार तुटलेल्या व छोट्या मनाचे असल्याची टीका केली. ही करताना अटलबिहार वाजपेयी यांच्या कवितांचा आधार घेतला.
राज्यात ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे, ते बघितले तर राज्य शासन अस्तिवात आहे का ? अशी शंका येत आहे. (Shiv sena) बहुमत असल्याचे बोलले जात असले तरीही राज्यात अनागोंदी माजली आहे. राज्यात कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कविता यावेळी आठवल्याशिवाय राहत नाही. 'छोटे मन से कोई बडा नही होता..तुटे मन से कोई खडा नहीं होता' तुटलेल्या आणि छोट्या मनाचे सरकार सध्या राज्यात कामकाज करत आहे, अशा शब्दात दानवे यांनी चिमटा काढला.
जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे एक घटना घडली. सदरील मारहाणीची अत्यंत चुकीची घटना असून मारहाण झालेल्या व्यक्तीने सांगून सुद्धा राजकीय दबावापोटी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख नवनाथ दौंड याच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
आमच्या पक्षाचा कार्यकर्ता असल्यानेच त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. नवनाथ दौंड सदरील व्यक्तीस मारहाण झाली त्या दिवशी प्रयागराज येथे होते, असे सांगून सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वामुळे गुन्हा दाखल करण्यात आला.
अशाप्रकारे अवैध पद्धतीने गुन्हा दाखल करून इतर पक्षातील कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात दमदाटीने प्रवेश करून घेतला जात आहे, असा आरोपही दानवे यांनी आपल्या भाषणात केला. मारहाण झालेल्या व्यक्तीवर नक्कीच चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली.
मात्र, हा व्यक्ती महादेवाच्या मंदिरासमोर भगवान शंकराचे वाहन नंदी यांच्यावर बसून असभ्य वर्तन करत होता, अपमान करत होता. राज्य शासन स्वत:ला हिंदुत्ववादी सरकार म्हणत असताना सुद्धा या घटनेवर कारवाई झाली नाही, असेही दानवे म्हणाले.
कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी विडंबन कविता सादर केली. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सोलापूरकर , कोरटकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली नाही.
एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे लोक पोलिसांच्या उपस्थितीत तोडफोड करतात. एकप्रकारे सत्ताधारीच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहेत, असा आरोपही दानवे यांनी यावेळी केला.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.