राज्यातील नगरपंचायत निवडणूक मतदानाला आजपासून सुरुवात

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा (OBC Reservation) निर्णय रद्द केल्यानंतर ही निवडणूक होत आहे.
Nagar Panchayat Election Voting

Nagar Panchayat Election Voting

Sarkarnama 

Published on
Updated on

मुंबई : राज्यातील 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा (OBC Reservation) निर्णय रद्द केल्यानंतर ही निवडणूक होत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात निवडणूकांचा प्रचाराचा धुरळा उडत होता. या निवडणूकीत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.

जळगाव (Jalgaon) : जळगावातील धडगाव वडफळ्या रोषमाळ बु. नगरपंचायतीच्या १७ जागा व जिल्ह्यातील इतर ४५ ग्रामपंचायतीमधील ५७ रिक्त जागांसाठी सकाळपासूनच शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. जळगाव नगरपंचायती मध्ये एकूण 17 जागांसाठी 48 उमेदवार रिंगणात आहे. राज्यात असलेले महाविकासआघाडी स्थानिक पातळीवर होऊ शकली नाही. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना, भाजप तिन्ही पक्षाने आपले उमेदवार उभे करून निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्तात पाहायला मिळाला. मतदारांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

<div class="paragraphs"><p>Nagar Panchayat Election Voting</p></div>
आमदार भोळे रुसले... दिलीप वळसे पाटलांच्या कार्यक्रमात लोकांमध्ये जाऊन बसले!

बुलढाणा (Buldhana) : बुलडाणा जिल्ह्यातील दोन नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान सुरू झाले आहे. मोताळा व संग्रामपूर या दोन नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. भाजप, शिसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षाची सरळ लढत आहे. कडाक्याची थंडी असली तरी इथे मात्र राजकीय वातावरण चांगलेच गरम झालेले दिसत आहे. मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत तर काही ठिकाणी थंडी असल्याने मतदान संथ गतीने सुरू आहे.

मोताळा (Motala) : मोताळा नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी 49 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. ओबीसी आरक्ष रद्द झाल्याने चार जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत त्या चार जागांसाठी पुढे निवडणुका घेण्यात येईल. तसेच संग्रामपूर नागरपंचायतीसाठी सुद्धा 13 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. यावेळी सर्व पक्ष स्वबळावर निवडणूका लढवताना दिसत आहे.

शहापूर (Shahapur) : शहापूर नगर पंचायतीवर पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार शहापूर नगर पंचायतीत जी विकास कामे झाली ती केवळ सेनेची सत्ता असतांनाच झाली आणि आम्ही केलेल्या विकासाच्या मुद्यावर आम्ही मतदान मागतले आहे. असा विश्वास राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष व शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला आहे.

<div class="paragraphs"><p>Nagar Panchayat Election Voting</p></div>
टीईटी गैरव्यवहार प्रकरणात परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे अटकेत

अहमदनगर (Ahamadnagar) : अहमदनगर जिल्ह्यातील ३ नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. नगर दक्षिण जिल्ह्यातील पारनेर आणि कर्जत येथे मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी थंडी असल्या कारणाने मतदान हे अतिशय संथ गतीने सुरू आहे. मात्र हळू हळू मतदान केंद्रावर गर्दी वाढत आहे. पारनेरचे माजी आमदार शिवसेनेचे विजय औटी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना पारनेर मध्ये मात्र राष्ट्रवादी विरूध्द शिवसेना अशीच लढत दिसते आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष पारनेर नगर पंचायतीकडे लागले आहे .

मावळ (Maval) : तर देहू नगरपंचायतीचे सकाळी 9.30 वाजेपर्यंत 13% मतदान झाले. सकाळ पासून 1084 पुरुषांनी तर 717 महिलांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com