टीईटी गैरव्यवहार प्रकरणात परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे अटकेत

सुखदेव डेरे (Sukhdev Dere) यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे
Sukhdev Dere Arrest in TET malpractice case

Sukhdev Dere Arrest in TET malpractice case

Published on
Updated on

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील (Teacher Eligibility Test) गैरव्यवहार प्रकरणात परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक केली. टीईटी 2018 च्या परीक्षेत झालेल्या घोटाळा प्रकरणात जी. ए. सॉफ्टवेअरच्या आणखी एका संचालक सुखदेव डेरेला (Sukhdev Dere) पुणे पोलिसांना बंगळुरमधून (Bangalore) ताब्यात घेतले आहे. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) रात्री उशीरा ही कारवाई केली, असल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी ही कारवाई केली आली. डेरे याला सोमवारी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यानंतर त्याला अटक केली. याबरोबरच पोलिसांच्या पथकाने जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी कंपनीच्या बंगलोर येथील कारवाईत तत्कालीन संचालक अश्विनकुमार यालाही अटक केली.

<div class="paragraphs"><p>Sukhdev Dere Arrest in TET malpractice case</p></div>
प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातच बंडखोरी : नानांनी रात्रीतून केले निलंबन...

पुणे पोलिसांनी 'टीईटी' प्रकरणी आतापर्यंत महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे, तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली आहे. त्यातच पोलिसांनी सुपे यांच्या घरावर टाकलेल्या छापेमारी सुमारे 3 ते 4 कोटी रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासामध्ये या गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत बरेच मोठमोठे अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात आता सुखदेव डेरेंचेही नाव पुढे आले आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी सोमवारी (२० डिसेंबर) सुखदेव डेरेला चौकशीसाठी बोलावले होते. त्याची कसुन चौकशी केल्यानंतर त्यांचाही या गैरव्यवहारात सहभाग असल्याची आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सकाळी त्याला अटक केली.

सुखदेव डेरेंचा वादग्रस्त कार्यकाळ

सुखदेव डेरे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त ही होते. त्याचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला असून 2016 च्या नियुक्ती प्रकरणातील गैरव्यवहार केल्याने त्याचे निलंबन केले होते. डेरेच्या अटकेने शिक्षण विभागात चांगलीच खळबळ माजली आहे.तर अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान गैरव्यवहार प्रकरणाचे मुळ असलेल्या जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी कंपनीच्या बंगलोर येथील कार्यालयात सायबर पोलिसांनी छापा टाकला. तेथून कंपनीचा तत्कालीन संचालक अश्विनकुमार यालाही पोलिसांनी अटक केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com