पोलिस दलातील भ्रष्टाचार उघड करणारे पोलिस उपनिरीक्षक सुनिल टोके निंलबित

टोकेंनी आतापर्यंत भ्रष्टाचारा विरोधात ४ याचिका दाखल केल्या आहेत. दरम्यान दुसऱ्यादा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
police
policesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : पोलिस दलातील भ्रष्टाचाराबद्दल जनहित याचिका करणारे, वरिष्ठांकडून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे, पोलिसांच्या (Police)गैरकृत्याबाबत सोशल मीडियातून जाहिरपणे मत मांडणारे अशी असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनिल टोके (Sunil Toke)यांना निलंबित करण्यात आले आहे.

टोकेंनी आतापर्यंत भ्रष्टाचारा विरोधात ४ याचिका दाखल केल्या आहेत. दरम्यान दुसऱ्यादा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ''भ्रष्टाचारा विरोधातला माझा लढा हा सुरूच राहणार, माझावर करण्यात आलेली कारवाई ही चुकीचे आहे. मी मोघंम आरोप केले नसून पुरावे पेनड्राइव्ह द्वारे देण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यामुळे निलंबनाच्या कारवाई विरोधात मी न्यायालयात दाद मागणार आहे,'' असे टोकेंनी 'साम टिव्ही' ला सांगितले.

police
रामदास कदमांच्या हातातून दापोलीपाठोपाठ मंडणगडही जाणार

लाच स्वीकारण्याचं दरपत्रक, टोके यांनी स्वतः केलेल्या स्टिंग आँपरेशनचे व्हिडिओ हे त्यांच्याकडे महत्वाचे पुरावे असल्याचा दावा ते करतात. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या सर्व प्रकरणाची चौकशी करून त्यावर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी देखरेख ठेवावी, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ठित आहेत. टोकेंनी न्यायालयात या सर्व प्रकरणांना आवाहन ही दिलं. टोके यांनी न्यायालयातही पोलिस दलातील भ्रष्टाचाराबाबत आपले मत मा़ंडले.

यावेळी त्यांच्यावर माध्यम व वृत्त वाहिन्यांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात वारवार खोट्या, तथ्यहीन व मोघम स्वरुपाचे आरोप करून स्वप्रसिद्ध प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असल्याने जनमाणसात पोलिसांची प्रतिमा मलिन होतं आहे. त्यामुळे बेशिस्त व अशोभनिय वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

police
राठोडांनी दाबलेला चौकशी अहवाल शिक्षणाधिकारी लोहारांनी काढला बाहेर

वाहतूक विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड आणि खालपासून वरपर्यंत विषवल्लीसारखी पसरलेली लाचखोरी सुनिल टोके या वरळीच्या बी. डी. डी चाळीत राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने उघडकीस आणायला सुरुवात केली आणि अवघ्या पोलिस दलात एकच हलकल्लोळ उडाला होता. पोलिस दलातील विविध गोष्टींमध्ये खरेदी-विक्री दरम्यान होणाऱ्या भ्रष्टाचारावरही त्यांनी प्रकाश टाकला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com