Sudhir Mungantiwar : भाजपच्या मंथन बैठकीला सुधीर मुनगंटीवारांची दांडी! पुन्हा एकदा नाराजीची चर्चा

Sudhir Mungantiwar BJP Meeting : सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार, विधानसभेचे अध्यक्षपद दिले जाणार अशा चर्चा सुरू आहेत. मात्र, असे असताना त्यांनी भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीलाच दांडी मारली आहे.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar Sarkarnama
Published on
Updated on

Sudhir Mungantiwar News : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या वर्धा येथील भाजपच्या मंथन बैठकीला दांडी मारल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे मागील आठवडाभरापासून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार, विधानसभेचे अध्यक्षपद दिले जाणार अशा चर्चा सुरू आहेत. असे असताना त्यांनी भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीलाच दांडी मारली आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते महाराष्ट्राच्या बाहेर असल्याचे समजते. त्यांनी बैठकीला येणे शक्य होणार नाही असे कळवले असल्याचे सांगण्यात येते.

विधानसभेची निवडणूक आटोपल्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान भाजपच्यावतीने विदर्भातील सर्व विजयी आमदारांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित झालेल्या सत्कार समारंभाला मुनगंटीवार आले नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमालाही ते उपस्थित नव्हते. त्यावेळीसुद्धा त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण उपस्थित राहू शकलो नाही असे कारण दिले होते.

सुधीर मुनगंटीवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. राज्याचे अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री असे महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. अडीच वर्षांच्या महायुतीच्या काळात त्यांच्याकडे सांस्कृतिक खाते देण्यात आले होते. पुन्हा महायुतीची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्यावर महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली जाईल असे बोलले जात होते. प्रत्यक्षात त्यांनी मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. तेव्हापासून मुनगंटीवार पक्षावर चांगलेच नाराज असल्याचे दिसून येते.

Sudhir Mungantiwar
Sanjay Raut BJP Mahayuti : खडसे अन् मलिकांचा जावई, शाहरूखचा मुलगा आर्यन ते किरण काळेपर्यंत..; राऊत भाजपच्या 'ट्रॅप'वर तुटून पडले

अलीकडे झालेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून सरकारलाच धारेवर धरले होते. चंद्रपूरचे भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनाही त्यांनी मित्रासाठी 95 लाखांच्या शासकीय निधीतून एक भिंत उभारली असल्याचा आरोप करून त्यांना चांगलेच कोंडीत पकडले होते.

शिवेंद्रराजेंकडून कौतुक

दोन दिवसांपूर्वी राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री शिवेंद्र राजे भोसले चंद्रपूरला एका कार्यक्रमाला आले होते. त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी भोसले यांनी सुधीरभाऊ आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याकडून अनेक आमदार सभागृहात कसे विषय मांडायचे बोलयचे हे शिकत असतात. त्यांची फाईल मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना रोखताना चारवेळा विचार करावा लागतो. भाजपात ज्येष्ठ नेत्यांना मान दिला जातो. त्यांच्या अनुभवाची सर्वांना गरज असल्याचे सांगून त्यांनी ते पुन्हा मंत्रिमंडळात परतणार असल्याचे संकेत दिले होते.

भाजपात दोन गट पडले

चंद्रपूर जिल्ह्यात भाजपात दोन गट पडले आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांना पक्षात घेण्यास सुधीर मुनगंटवार यांना कडाडून विरोध केला होता. यासाठी ते केंद्रीयमंत्री अमित शहा यांना भेटले होते. मात्र त्यांच्या विरोध झुगारून भाजपने जोरगेवारांना पक्षात घेतले. चंद्रपूर मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट दिले. त्यानंतर जोरगेवार समर्थकांची भाजपच्या शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावरही मुनगंटीवारांचा रोष आहे.

Sudhir Mungantiwar
Kailas Gorantyal News : कैलास गोरंट्याल दुर्लक्षितच; खासदार कल्याण काळेही भेटले नाही; आता भाजपा प्रवेश पक्का!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com