Sudhir Mungantiwar : अखेर मुनगंटीवारांना मिळाली नवी जबाबदारी; अजितदादांनी दिली ताकद

Sudhir Mungantiwar : महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले तेव्हा मंत्रिपद मिळण्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आघाडीवर होते. पण ऐनवेळी त्यांच्या नावाला रेड सिग्नल आल्याचे सांगितले जाते.
Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar sarkarnama
Published on
Updated on

Sudhir Mungantiwar case : भाजप नेते सुधीर मुनंगटीवार हे मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे काही दिवसांपासून नाराज होते. सभागृहाबाहेर आणि सभागृहातील भाषणांमधून त्यांची नाराजी सातत्याने दिसून येत होती. पण अखेर मुनगंटीवार यांना नवी जबाबदारी दिली आहे. मुनगंटीवार यांनी 2014 ते 2019 असे पाच वर्षे राज्याचे अर्थमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांचा हा अनुभव लक्षात घेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

सभागृहात गुरुवारी (20 मार्च) अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी मुनगंटीवार यांनी केरळचे उदाहरण देत राज्याच्या उत्पन्न वाढीच्या स्त्रोतांकडे अजित पवार यांचे लक्ष वेधले. राज्याला लॉटरीपासून 43 कोटींचे उत्पन्न मिळते. बक्षीस आणि कर वजा जाता शासनाला 3 कोटी 50 लाख रुपये उरतात. अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग आहे, चांगले पगार आणि सुविधा आहेत. त्यामुळे उत्पन्न वाढीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Sudhir Mungantiwar
Uddhav Thackeray: दिशा सालियन फाईल Reopen होण्याची शक्यता, ठाकरेंनी महायुतीवरच टाकला बॉम्ब; म्हणाले, तर ते तुमच्यावरच बुमरँग...

त्याचवेळी केरळ राज्याला मात्र लॉटरीपासून 12 हजार कोटींचे उत्पन्न मिळते. मग, आपण त्यांच्या चांगल्या गोष्टी अमलात का आणू नयेत, अशी विचारणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तसेच यासाठी आमदारांची अभ्यास समिती स्थापन करण्याची मागणी केली. यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी मुनगंटीवार यांच्याच अध्यक्षतेखाली समिती नेमत असल्याची घोषणा केली. त्यामुळे इतर राज्यांमध्ये कोणकोणत्या स्त्रोतांमधून चांगले उत्पन्न होते आणि ते कसे मिळते हे शोधण्याची जबाबदारी मुनगंटीवार यांच्याकडे असणार आहे.

Sudhir Mungantiwar
BJP : विधानपरिषदेतही भाजपच सर्वात मोठा पक्ष! अजितदादा-शिंदे बरेच लांब; 'मविआ' महायुतीच्या आसपासपाही नाही...

शेवटच्या क्षणी मंत्रिपद नाकारले?

महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले तेव्हा मंत्रिपद मिळण्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आघाडीवर होते. देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवारांच्या मंत्रि‍पदासाठी ग्रीन सिग्नल दिला होता. दिल्लीत मंत्र्यांच्या नावाची जी यादी पाठवले होती त्यामध्ये मुनगंटीवार यांचे देखील नाव होते. मात्र, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून मुनंगटीवार यांच्या नावाला ऐनवेळी रेड सिग्नल दिल्याने शेवटच्या क्षणी त्यांचे नाव मंत्रि‍पदाच्या यादीतून वगळ्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com