BJP News: मंत्रिपदासाठी ऐनवेळी डावललेल्या मुनगंटीवारांचा भाजपात 'एकनाथ खडसे' होणार? विदर्भातील नेत्याचं मोठं विधान

Vidarbha BJP Politics : माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विरोधी पक्षनेत्यासारखी सरकारसह भाजपवर जोरदार टीका करत सुटले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमधील चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या भाजपच्या वाताहतीवरूनही त्यांनी हल्लाबोल करताना मंत्रि‍पदाचा मुद्दा उकरुन काढला होता. आता पहिल्यांदाच भाजपमधून त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
Sudhir Mungantiwar Eknath Khadse Ashish Deshmukh
Sudhir Mungantiwar Eknath Khadse Ashish Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये मंत्रि‍पदासाठी ऐनवेळी पत्ता कट झालेल्या नेत्यांमध्ये विदर्भ भाजपचा प्रमुख चेहरा आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश होता. मुनगंटीवारांचा मंत्रिमंडळातील वर्णी ही फिक्स होती,महाराष्ट्रातून दिल्लीत पाठवलेल्या यादीतही त्यांचं नाव होतं. पण दिल्लीतून मुनगंटीवारांचं नाव डावलण्यात आलं. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता.

यानंतर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) विरोधी पक्षनेत्यासारखी सरकारसह भाजपवर जोरदार टीका करत सुटले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमधील चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या भाजपच्या वाताहतीवरूनही त्यांनी हल्लाबोल करताना मंत्रि‍पदाचा मुद्दा उकरुन काढला होता. आता पहिल्यांदाच भाजपमधून त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आमदार म्हणून आशिष देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. आता त्यांनीच माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या टीकेवर पलटवार केला आहे.यावेळी त्यांनी थेट मुनगंटीवार हे नाथाभाऊंच्या मार्गावर तर चालले नाहीत ना? असा सवाल करत त्यांना डिवचलं आहे.

भाजप नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांची अशी कोणतीही इच्छा नाही की,पक्षात मतभेद निर्माण व्हावेत. आता फक्त मुनगंटीवारांनी फडणवीसांवर श्रद्धा आणि संयम ठेवावा,असा सल्ला दिला. मुनगंटीवार हे वरिष्ठ नेते असून त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल, त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींची मेहेरनजर राहील,असंही देशमुख यांनी म्हटलं.

Sudhir Mungantiwar Eknath Khadse Ashish Deshmukh
Rahul Gandhi: पराभवाचे धक्क्यावर धक्के सहन केलेल्या काँग्रेससाठी मोठी बातमी! राहुल गांधी पंतप्रधान होणार..? देशाच्या राजकारणात उलथापालथ..?

आशिष देशमुख यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या भूमिकेबाबतच शंका उपस्थित केली आहे.ते म्हणाले, 'सुधीरभाऊ,नाथाभाऊंच्या (एकनाथ खडसे) मार्गावर चालले आहेत का? असे प्रश्न निर्माण करणारे काही वक्तव्ये त्यांच्याकडून होत आहे.देवेंद्र फडणवीसांची अशी बिलकूल इच्छा नाही. फडणवीसांवर मुनगंटीवारांना श्रद्धा,सबुरी ठेवणं गरजेचं आहे. त्यामधून मार्ग निघेल. ते वरिष्ठ आहेत. त्यांचा अनुभव पाहून पक्षातील वरिष्ठ त्यांच्यावर मेहेरनजर ठेवतील,असं आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.

चंद्रपुरात भाजपला वाढविण्यात मुनगंटीवारांचा मोठा वाटा मानला जातो.पण चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपला दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मुनगंटीवारांनी पक्षावर उघड नाराजी व्यक्त केली.ते म्हणाले, काँग्रेसनं विजय वडेट्टीवार यांना बळ दिले,मात्र माझ्याच पक्षानं माझी शक्ती हिरावून घेतली,असं गंभीर विधान करत पक्षनेतृत्वावर निशाणा साधला.

मुनगंटीवार यांनी या निवडणुकीत पक्षाने गटबाजीला पोषक वातावरण तयार केल्याचा आरोपही केला. तसेच शनि शिंगणापूरनंतर आमचा पक्ष असा एकमेव पक्ष आहे, जिथे दरवाजे सतत उघडे असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील अकरापैकी बहुतांश नगरपरिषदा भाजपच्या हातून निसटल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. मलाच नाही,तर चंद्रपूर–गडचिरोली,भंडारा आणि गोंदिया या चारही जिल्ह्यांतून एकाही नेत्याला मंत्रिपद न मिळाल्यावरूनही त्यांनी तोंडसुख घेतले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com