Eknath khadse News : खडसेंना तात्पुरता दिलासा; पण, न्यायालयीन कारवाईचा पिच्छा काही सुटेना!

सत्ताधारी भाजपशी मैत्री केल्यावर अनेक नेत्यांवरील खटले स्थगित झाले आहेत. काहींचे खटले चालविण्याची प्रक्रिया संथ झाली. मात्र एकनाथ खडसे यांची त्यातून सुटका झालेली नाही.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या मागे न्यायालयीन खटल्यांचा ससेमीरा कायम आहे. भोसरी (पुणे) भूखंड खरेदीचा खटला कायम आहे. यासंदर्भात राज्य सरकार पाठपुरावा करीत आहे.

सत्ताधारी भाजपशी मैत्री केल्यावर अनेक नेत्यांवरील खटले स्थगित झाले आहेत. काहींचे खटले चालविण्याची प्रक्रिया संथ झाली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांची त्यातून सुटका झालेली नाही.

भोसरी येथील औद्योगिक भूखंड खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात राज्य सरकारने खटला दाखल केला आहे. त्याची सुनावणी मुंबई न्यायालयात सुरू आहे. या सुनावणीला गैरहजर राहिल्याने खडसे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढला होता.

याबाबत काल खडसे यांच्या वकिलांनी प्रकृतीच्या कारणास्तव खडसे उपस्थित राहू शकले नाही. विविध कारणांमुळे त्यांना गेल्या काही सुनावणींना हजर राहता आलेली नाही. त्याबाबत खडसे यांची भूमिका न्यायालयाने समजून घेतली.

त्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याची सूचना केली. त्याच्या सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी देण्यात येणार नाही. या सबबीवर खडसे यांना दिलासा देत अजामीनपात्र वॉरंट रद्द केले.

आमदार खडसे महसूल मंत्री असताना त्यांच्या कुटुंबीयांसाठी भोसरी येथील औद्योगिक भूखंड खरेदी करण्यात आला होता. त्या व्यवहारात कायदेशीर तरतुदींचा भंग झाला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या संदर्भात मुंबई विशेष न्यायालयात खटला सुरू आहे.

Eknath Khadse
Vijay Shivtare News: शिंदेंच्या बड्या मोहऱ्याला गड राखण्यात अपयश; भाजपाचा नेम-शिवतारेंचा झाला गेम?

खडसे यांनी 2016 मध्ये मंत्रीपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा दावा शासनाने केला आहे. श्री खडसे भारतीय जनता पक्षाची थेट संघर्ष करीत आले आहेत. राज्य शासन त्यामुळे खडसे यांच्या विरोधात आक्रमक आहे.

येथील भोसरी औद्योगिक वसाहतीतील हा भूखंड आहे. ही जमीन अत्यंत कमी किमतीत खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. 3.75 कोटींना हा भूखंड खरेदी करण्यात आला होता. पत्नी आणि जावयाच्या नावावर हा भूखंड खरेदी करण्यात आल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या भूखंडाचे बाजार मूल्य 40 कोटी रुपये असल्याचा दावा केला जातो. त्यादृष्टीने मुंबईच्या विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. खटल्यात आरोप पत्र निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे

न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट रद्द करून खडसे यांना तत्पुरता दिलासा दिला. मात्र भोसरी भूखंडाच्या खरेदीचा वाद आणि खटला यातून खडसे यांना दिलासा मिळालेला नाही. राज्य शासन आणि त्यांच्या विरोधकांकडून त्यासाठी खडसेंचा पिच्छा पुरवला जात आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com