Vijay Shivtare News: शिंदेंच्या बड्या मोहऱ्याला गड राखण्यात अपयश; भाजपाचा नेम-शिवतारेंचा झाला गेम?

Pune ZP Election Results 2026 Vijay Shivtare News: माजी मंत्री आणि सध्या आमदार असलेले विजय शिवतारे हे महत्त्वाचे मानले जातात. मात्र शिवतरेंचा त्यांच्याच गडामध्ये होणारे एकामागून एक पराभव हे शिंदेंच्या सेनेसाठी चिंतेचा विषय बनले आहेत.
Vijay Shivtare
Vijay ShivtareSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे जिल्ह्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या लाटेने मोठ्या राजकीय पक्षांसह अनेक नेत्यांची धुळधाण झाली असल्याचे पाहायला मिळालं. अनेकांचे गड ढासळले त्यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार विजय शिवतारे यांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये विजय शिवतारे यांनी एकीकडे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आव्हान तर दुसरीकडे तत्कालीन काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या कडव्या झुंजीचा सामना करत विजय साकारला होता. कठीण परिस्थितीमध्ये साकारलेल्या विजयामुळे शिवतरेंच कौतुक देखील झालं होतं.

त्यानंतर सातत्याने विजय शिवतारे यांना त्यांच्या मतदार संघामध्ये पराभवचे धक्के बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे महापालिका निवडणुकांमध्ये देखील शिवतरेंनी एट्री घेतली होती. पुणे महापालिकेच्या निवडणुकीबाबत झालेल्या शिंदे सेनेच्या सर्व चर्चांमध्ये आणि तिकीट वाटपामध्ये शिवतारे आघाडीवर होते. तसेच पुणे शहराच्या उपनगरांमध्ये त्यांनी ताकद ही लावली होती मात्र पुणे महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेचा सुपडा साफ झाला.

त्यापूर्वी सासवड नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील भाजपने त्यांना आस्मान दाखवले असल्याचा चित्र पाहायला मिळालं. काँग्रेसचे माजी आमदार असलेल्या संजय जगताप यांना भाजपने पुरंदर विधानसभा मतदारसंघातून पक्ष प्रवेश दिला आहे.त्यानंतर ते सातत्याने शिवतारे यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील भाजपने मुसंडी मारत इतिहासात पहिल्यांदाच सासवड नगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला.

तर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपने इतिहास रचला आहे. ज्या मातीमध्ये भाजपाला कधीही आपला उमेदवार विजयी करता आला नव्हता त्या मातीमध्ये संजय जगताप यांच्या रूपाने भाजपने इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपले उमेदवार निवडून आणले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुण्यातील राजकारणामध्ये माजी मंत्री आणि सध्या आमदार असलेले विजय शिवतारे हे महत्त्वाचे मानले जातात. मात्र शिवतरेंचा त्यांच्याच गडामध्ये होणारे एकामागून एक पराभव हे शिंदेंच्या सेनेसाठी चिंतेचा विषय बनले आहेत.

Vijay Shivtare
ZP Election Results: झेडपी, पंचायत समिती निवडणुकीतही भाजपच नंबर 1; ग्रामीण भागातही पकड मजबूत

पुरंदर मध्ये जिल्हा परिषदेच्या चार जागा येतात मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेने चार पैकी तीन जागा जिंकल्या होत्या तसेच पंचायत समितीवर देखील आपली सत्ता आणली होती. यंदाच्या निवडणुकीमध्ये शिंदे यांच्या सेनेला चार पैकी एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी दोन जागा जिंकले आहेत.

पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली असून आठ पैकी चार जागा या राष्ट्रवादीच्या खात्यामध्ये असून भाजप दोन आणि शिंदेंची सेना दोन असंच चित्र सध्या पुरंदरचा पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुरंदर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असणार हे निश्चित झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com