Ajit Pawar Death: अजितदादांच्या धक्कादायक एक्झिटनंतर 'बिगबॉस' विजेता सूरज चव्हाणचा कंठ दाटला; म्हणाला,'माझा देव चोरला...'

Suraj Chavan Emotional Post: महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणा, प्रशासनावरची मजबूत पकड आणि दिलेला शब्द पाळणारा नेता अशी ओळख असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं.
Suraj Chavan Emotional Post After Ajit Pawar Demise
Suraj Chavan Emotional Post After Ajit Pawar DemiseSarkarnama
Published on
Updated on

Baramati News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांचं विमान अपघातात मंगळवारी(ता.28) दु:खद निधन झालं आहे.अजितदादा हे मुंबईहून विमानानं बारामती निघाले होते. पण विमान लँडिंगआधीच बारामती विमानतळाजवळील एक शेतात कोसळले. त्यानंतर विमानाचा ब्लास्ट झाला.

या विमान अपघातात महाराष्ट्रानं एक दिलदार नेता गमावला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत. पण ज्याचं स्वप्नं स्वत:अजितदादांनी पूर्ण केली होती. मराठी बिगबॉसचा विजेता सूरज चव्हाणनं भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सूरज चव्हाणनं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. या पोस्टमध्ये सूरज चव्हाणनं अजितदादांना नमस्कार करतानाच त्यांचे काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देताना त्यानं मित्रांनो माझा देव चोरला आज असं म्हटलं आहे.

याचवेळी सूरज चव्हाणंनं मित्रांनो मला अजिबात विश्वास होत नाहीये की,आपले लाडके कार्यसम्राट अजितदादा आपल्यात नाहीयेत… माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी इतकं सोन्यासारखं घर बांदून दिलं… माझी काळजी घेतली.. मला नवीन आयुष्य मिळवून दिलं… अजितदादांसारखा देव माणूस या जगात नाही…याचं मला लई वाईट वाटतय…लई दुःख होतंय…माझ्या आई आप्पानंतर अजितदादाने माझ्यासाठी इतकं केलं. मी आयुष्यभर त्यांची आठवण माझ्या काळजात सांभाळून ठेवेन अशी एकदम काळजाला हात घालणारी पोस्ट सूरज चव्हाणनं केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्टवक्तेपणा,वक्तशीरपणा,प्रशासनावरची मजबूत पकड आणि दिलेला शब्द पाळणारा नेता अशी ओळख असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. मंगळवारी 28 जानेवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजितदादांच्या अकाली जाण्यानं संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.

Suraj Chavan Emotional Post After Ajit Pawar Demise
Ajit Pawar Accident: मोठी बातमी: अजितदादांचा अपघाताआधी शेवटचा फोन भाजप नेत्याला; म्हणाले, 'बारामतीत उतरल्यावर...'

प्राथमिक माहितीनुसार, विमानतळाच्या रनवेवर दृश्यमानता कमी असल्यानं हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पायलटला धावपट्टी दिसत नसल्याने दोनवेळा पालटणे विमानतळाभोवती गिरट्या घालत असल्याचं देखील सांगितलं जात आहे. आणि त्यानंतर आपल्याला रनवे दिसत असल्याचं सांगत वैमानिकानं ते विमान उतरवण्याचा प्रयत्न केला आणि याचदरम्यान, विमान अपघात झाला असल्याचं माहिती समोर येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणला घर बांधून देण्याचे वचन पूर्ण केले आहे. त्यांनी बारामतीतील मोढवे गावात सूरजचे दोन मजली आलिशान घर बांधून दिले. एप्रिल 2025 मध्ये स्वतः अजितदादांनी घराच्या कामाची पाहणी केली होती आणि नोव्हेंबर 2025 मध्ये सूरजने नवीन घरात प्रवेश केला होता.

अजित पवार यांनी आपला शब्द पाळत सूरजला हक्काचे घर दिले. या कामाची पाहणी अजितदादांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली होती. नवीन घरात प्रवेश केल्यावर सूरज चव्हाणने अजितदादांचे आभार मानले. तो म्हणाला की, “आदरणीय अजितदादा पवार, फक्त तुमच्यामुळेच माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाला हक्काचे घर मिळाले आहे.

बारामतीजवळच्या मोढवे गावात सूरजचे घर बांधण्यात आले, ज्याचे बांधकाम उच्च दर्जाचे करण्यात आले होते. अजितदादांनी काम सुरू असताना कॉन्ट्रॅक्टरला सूचना देऊन घराचे बांधकाम दिवाळीपूर्वी पूर्ण करण्यास सांगितले होते. सूरजने अजितदादांना आपला 'देव' मानले आणि घराचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com