Sushma Andhare : अशोक चव्हाणांचा 'तो' फोटो पाहून सुषमा अंधारे संतापल्या; म्हणाल्या, 'तुम्ही किंवा तुमच्या तीर्थरूपानी...'

Sushma Andhare Criticized ashok Chavan : संसदेबाहेर भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुकी झाली. त्यानंतर भाजपच्या खासदारांनी आंदोलन केले. या आंदोलामध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण सहभागी झाले होते.
Sushma Andhare ashok Chavan
Sushma Andhare ashok Chavansarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare News : संसदेत अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्देशून वापलेल्या शब्दांमुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. संसदेबाहेर भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुकी झाली. त्यानंतर भाजपच्या खासदारांनी आंदोलन केले. या आंदोलामध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण सहभागी झाले होते. 'बाबासाहेब आंबेडकर जीको दो बार चुनाव हराया काँग्रेस माफी मांगे...', असा फलक त्यांच्या हातात होता. फलक हातात असलेल्या त्यांच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अशोक चव्हाण हे काँग्रेसकडून दोन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी हातात घेतलेल्या फलकावरून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा आंधारे यांनी 'अशोकरावजी हे वागणं आपल्याला शोभत नाही. यालाच म्हणतात, खायचं कुडव्याच आणि गायचं उडव्याचं', असे म्हणत टोला लगावला आहे.

Sushma Andhare ashok Chavan
Jayant Patil : ‘तुमची कोणाचीही गरज नाही; एक मुख्यमंत्री काफी है, सांगण्यासाठीच अधिवेशन होतं’; जयंतरावांनी मोका साधलाच

सुषमा अंधारे यांनी फेसबूक पोस्टमधून अशोक चव्हाण यांना तिखट प्रश्न विचारले आहेत. एवढा मोठा साक्षात्कार आपल्याला काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद उपभोगताना का बरं झाला नाही? सध्या आपल्याला 66 वे वर्ष चालू आहे. वय वर्ष 65 होईपर्यंत आपल्या दोन पिढ्या याच काँग्रेसच्या लाभार्थी राहिल्या. तेव्हा हे तत्त्वज्ञान का सुचलं नाही? असा टोलाही अंधारे यांनी चव्हाण यांना लगावला आहे.

'काँग्रेसने दिलेले मुख्यमंत्रीपद त्याचवेळी त्यांच्याच तोंडावर भिरकावून देत हा फलक तुम्ही किंवा तुमच्या तीर्थरूपानी हातात का घेतला नाही ? ज्या काँग्रेसच्या नावाने फलक हातात घेतला आहे त्या काँग्रेसच्याच जीवावर शाळा, कॉलेज , डेअरी , डाळ मिल , ऑइल मिल, पेपर मिल , साखर कारखाने , मेडिकल कॉलेज, करोडोचे टेंडर्स , लाभाच्या जागा, पुढच्या पाच-पन्नास पिढ्यांना पुरेल एवढी जायदाद कमवल्यावर आत्ता तुम्हाला हे शेंड्यावरच शहाणपण सुचतंय का ?', असा प्रश्नांचा भडिमार अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अशोक चव्हाण यांच्यावर केला आहे.

भूमिका काय?

इथे मुद्दा काँग्रेसने काय केलं किंवा भाजपने काय केलं हा असूच शकत नाही.मुद्दा एका तडीपार माणसाकडून बाबासाहेबांच्या संदर्भाने झालेला उल्लेख यावर तुमची काय भूमिका आहे ते आधी सांगा, असे आवाहन अंधारे यांनी केले आहे.

Sushma Andhare ashok Chavan
Arvind Kejriwal Video : आंबेडकरांच्या अवमानावरून राजकारण तापले; केजरीवालांनी केली मोठी घोषणा, म्हणाले 'दलित विद्यार्थ्यांना...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com