Sushma Andhare : राज-उद्धव ठाकरे एकत्र येत असताना सुषमा अंधारेंवर मोठी कारवाई; हक्कभंग मंजूर, विशेषाधिकार समिती करणार शिक्षा?

Raj Uddhav thackeray Alliance Sushma Andhare Maharashtra Assembly : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कुणाल कामराचा एकनाथ शिंदेंवर व्यंग करणारा व्हिडिओ शेअर केला होता. तसेच सुषमा अंधारे यांनी देखील व्हिडिओ बनवत शिंदेंची खिल्ली उडवली होती.
 Sushma Andhare
Sushma Andharesarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare News : मराठीच्या मुद्यावर उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकाच मंचावर येत आहेत. वरळीतील डोममध्ये ते मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, ठाकरे बंधू एकत्र येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या यांच्या विधासभेत हक्कभंग मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना काय शिक्षा होणार याचा निर्णय विशेषाधिकार समिती घेणार आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.

काॅमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारे गाणे तयार केले होते. सुषमा अंधारे यांनी कुणाला कामराला पाठींबा दिला होता. कामरा याच्या जिथे शो झाला होता तेथे शिवसैनिकांनी तोडफोड केली होती. तसेच कामराच्या विरोधात अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल केला होता.

कुणाला कामराला अटकेपासून न्यायालयाने संरक्षण दिले असले तरी विधानसभेत त्याच्या आणि त्याला पाठींबा देणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात गुरुवारी हक्कभंगचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा मंजूर झालेल्या प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आला आहे.त्यामुळे या दोघांना किती दिवसांचा तुरुंगावास होणार अथवा माफी देण्यात येणार याचा निर्णय विशेषाधिकार समिती घेणार आहे.

 Sushma Andhare
Marathi Vijay Melava live updates: ठाकरे बंधूंच्या मेळाव्यापूर्वी मनसैनिक ताब्यात; दादर पोलिसांची कारवाई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कुणाल कामराचा एकनाथ शिंदेंवर व्यंग करणारा व्हिडिओ शेअर केला होता. तसेच सुषमा अंधारे यांनी देखील व्हिडिओ बनवत शिंदेंची खिल्ली उडवली होती. हक्काभंगचा प्रस्ताव भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत मांडला तो मंजूर झाल्यानंतर हा प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी विशेषाधिकार समितीकडे पाठवला.

 Sushma Andhare
Dr. Ashok Uike Politics: आदिवासी मंत्री अशोक उईके पाठ फिरताच आश्वासन विसरले, आदिवासींच्या शिक्षणाचा बोजवारा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com