

Pune News :शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेबाबत (TAIT) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील भावी शिक्षकांना मोठा झटका बसला आहे.
ही परीक्षा उत्तीर्ण पण व्यावसायिक अर्हता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध कागदपत्रे मुदतीच्या आत सादर न केल्यामुळे २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात आले आहेत. एकूण २ हजार २०७ विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
या निकाल रद्द करण्यात आलेल्या एकूण २ हजार २०७ विद्यार्थ्यांची यादी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. www.mscepune.in या परीक्षा परिषदेची संकेतस्थळांवर या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबतीत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा विचार सद्यस्थितीत केला जाणार नाही, असेही अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा- २०२५’ (TAIT) परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक कागजपत्रे सादर करण्याच्या सूचना परीक्षा परिषदेने दिल्या होती.पण या मुदतीत कागदपत्र सादर न केल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आला होता. निकाल राखून ठेवण्यात आलेल्या २ हजार ५३७ विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत राज्य परिषदेने मुदत वाढवून दिली होती. राज्य परिषदेने या विद्यार्थ्यांना वेळोवेळी एसएमएसद्वारे २५ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रांची पूर्तता करा, असे सांगितले होते. यापैकी २ हजार २०७ विद्यार्थ्यांनी मुदतीत कागदपत्रे सादर केलेी नाहीत, त्यांचे निकाल रद्द करण्यात आले आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचे अर्ज भरताना बी.एड. परीक्षेचे व डी.एल.एड. परीक्षेसाठी बसल्याचे (अपीअर्ड) अर्जात नमूद केले होते, या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अर्हता त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत सादर करणे अनिवार्य होतं. पण त्यांनी राज्य परीक्षा परिषदेला मुदत वाढवूनही सादर केले नाहीत, त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.