

TET exam shocking result : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नोव्हेंबर 2025 मध्ये शिक्षक पात्रता चाचणीचा परीक्षा (टीईटी) घेण्यात आली. परीक्षेचा निकाल सरासरी केवळ दहा टक्के लागला असून 90% टक्के गुरुजी या परीक्षेत नापास झाले आहेत. या परीक्षेची काठीण्यपातळी उच्च आहेत की शिक्षक या परीक्षेला हलक्यात घेत आहेत, हे समजायला मार्ग नाही.
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियमातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत नियुक्त शिक्षकांना तसेच यापुढे नियुक्त होऊ पाहणार्! या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीची केली. तेव्हापासून शासन या परीक्षेचे आयोजन करीत आहे.
मात्र, या परीक्षेत फारच नगण्य शिक्षक उत्तीर्ण होत आहे. आतापर्यंत कधीही पाच-सहा टक्केपेक्षा अधिक निकाल लागलेला नाही. यावर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबरला ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला राज्यभरातून चार लाखांच्या आसपास शिक्षक बसले होते. पहिला पेपर इयत्ता पहिली ते पाचवीला शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी होता. या पेपरला जवळपास दोन लाख तीन हजार ३३८ शिक्षक बसले होते. यापैकी केवळ चार टक्के शिक्षक उत्तीर्ण झाले. पेपर दुसरा हा वर्ग सहावी ते आठवीला शिकविणारे शिक्षकांसाठी होता. या पेपरला राज्यातून गणित विज्ञानसाठी ७५ हजार ५९९ शिक्षक तर सामाजिकशास्त्र विषयासाठी एक लाख २५ हजार ७४८ शिक्षक बसले होते.
या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या गटातील शिक्षकांना ६० टक्के (किमान ९० गुण) तर इतर मागासवर्गीय व्हीजेएनटी वर्गातील शिक्षकांसाठी ५५ टके (किमान ८२ गुण) तर एससी/एसटी व दिंव्याग गटातील शिक्षकांसाठी ५० टक्के (किमान ७५ गुण) आवश्यक होते. या परीक्षेचा १६ जानेवारीला अंतरिम निकाल घोषित करण्यात आला. त्यात दुसर्!या पेपरचा गणित-विज्ञान शिक्षकांमधून २८ टक्के शिक्षक उत्तीर्ण झाले. सामाजिकशास्त्र विषयाच्या शिक्षकांमधून ३.२२ टक्के शिक्षक उत्तीर्ण झाले. निकालात संशय असणार्!या शिक्षकांना आता २१ जानेवारीपर्यंत गुण पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
पुन्हा परीक्षा कशासाठी? शिक्षक म्हणून नियुक्त होणारा व्यक्ती डीएड, बि. एड ही परीक्षा उत्तीर्ण झालेला असतो. हीच त्यांची पात्रता परीक्षा असते. त्यामुळे नियुक्तीच्या वेळी किंवा सेवेत असताना पुन्हा पात्रता परीक्षा देण्याची गरज काय, असा शिक्षकांचा प्रश्न आहे. जर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ही परीक्षा घेतली जात असेल तर शासनाने या परीक्षेची काठीण्यपातळी साधारण ठेवावी, असा सूर शिक्षकांचा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.