Eknath Shinde political news : ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिंदेंना फरक पडणार नाही; घोडामैदान समोरच असल्याचा शिवसेनेच्या मंत्र्याचा इशारा

Shiv Sena minister statement News : सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याने एकनाथ शिंदेंना काहीही फरक पडणार नाही.
Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राज व उद्धव ठाकरे बंधू युती करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. त्यासोबतच येत्या काळात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबवली व नाशिक महापालिका मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्रित निवडणूक लढणार असल्याची घोषणा राऊत यांनी केली. त्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याने एकनाथ शिंदेंना काहीही फरक पडणार नाही, असे मत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.

ठाकरे बंधूंच्या युतीवर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांनी धाराशीवमध्ये बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. कोणी कितीही युती करू द्या, काहीही बोलू द्या, महायुतीला काहीही फरक पडणार नाही. येत्या काळात घोडामैदान समोर असल्याचे सांगत थेट इशारा दिला आहे.

Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
BJP News: वाहतूक पोलिसांचा सीएम फडणवीसांच्या जवळच्या आमदाराला मोठा दणका; नेमकं काय घडलं?

हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेल्या राज व उद्धव ठाकरे बंधूनी एकत्र येत वरळी येथे मेळावा घेत मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर आता येत्या काळात मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) एकत्र येत निवडणूक लढणार असल्याचे आता जवळपास फायनल झाले आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधत ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणाच केली आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबवली व नाशिक या महापालिकेत मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येत निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis masterstroke : मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच घमासान; ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी फडणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक'; लाडक्या नेत्यांना उतरवले मैदानात

त्यानंतर सर्वस्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर टीका केली आहे. यावेळी सरनाईक म्हणाले, 'कोणी कितीही युती करू द्या, काहीही बोलू द्या, महायुतीला काहीही फरक पडणार नाही. सगळीकडे महायुतीचे महापौर बसतील. त्यामुळे महायुतीला चिंता करण्याची गरज नाही.'

Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Dhanjay Munde : 'तुमचे राष्ट्रीय नेते अद्याप अविवाहितच'; धनंजय मुंडेंची आघाडीच्या उमेदवारावर खोचक टीका

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबवली, नाशिक सगळीकडे महायुतीचे नगरसेवक निवडून येतील. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याने एकनाथ शिंदेंना काहीही फरक पडणार नाही, असे सरनाईक यांनी ठणकावून सांगितले. विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठ्या फरकाने विजय मिळवला असल्याने चिंता करण्याची गरज नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Raj Thackeray, Eknath Shinde, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis masterstroke : मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच घमासान; ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी फडणवीसांचा ‘मास्टरस्ट्रोक'; लाडक्या नेत्यांना उतरवले मैदानात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com