
Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. त्यासाठीचे प्लॅनिंग केले जात असतानाच तत्पूर्वी होत असलेल्या दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे बंधू व भाजपमध्ये घमासान पहावयास मिळणार आहे. ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी सीएम फडणवीसांनी त्यांच्या दोन लाडक्या नेत्यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीत भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे व काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तत्पूर्वी मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणुक होत आहे. या सोसायटीसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेना एकत्र आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे.
ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर प्रथमच ही निवडणूक लढवत आहेत. भाजपकडून सहकार पॅनलतर्फे दोघे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूना पराभूत करण्यासाठी यावेळेस भाजपने (BJP) मोठे प्लॅनिंग केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर दोघेही मैदानात उतरले आहेत. बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या पॅनलविरोधात भाजपचे सहकार समृद्ध पॅनल निवडणूक लढणार आहे.
ठाकरे बंधू किती जागा लढणार ?
दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडीट सोसायटीच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे. उद्धव ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती मैदानात उतरणार आहे. उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. बेस्टच्या या निवडणुकीत 21 जागापैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा लढणार आहे.
या निवडणुकीसाठी भाजपचे नेते प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांनी श्रमिक उत्कर्ष सभा तसेच इतर पाच संघटना एकत्र आणत पॅनल तयार केले आहे. सहकारात ठाकरे बंधू यांची कामगिरी शून्य आहे. तर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर गेल्या 20 वर्षांपासून सहकारात आहेत. त्याचा फायदा भाजपच्या पॅनेलला होणार आहे. त्याशिवाय सीएम देवेंद्र फडणवीस यांचे हात या पॅनेलच्या पाठीशी असणार आहेत. त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
बेस्टची निवडणूक ठरणार लिटमस टेस्ट
ठाकरे यांची शिवसेना (Shivsena)आणि मनसेच्या कामगार संघटना बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आले आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे बंधूंच्या विरोधात भाजपने रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे आगामी काळात होता असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच होणारी ही लढत लिटमस टेस्ट ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात कोणाचे पारडे जड राहणार हे समजणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.