Nitin Deshmukh On Bawankule: ठाकरे गटाच्या आमदारानं बावनकुळेंना 'मतिमंद माणूस' म्हणून डिवचलं ; दिलं 'हे' आव्हान

Maharashtra Politics : चंद्रशेखर बावनकुळेची काय औकात आहे, उध्दव ठाकरेंना....
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

BJP Vs Thackeray Group News : शिवसेनापक्षप्रमुख (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) उध्दव ठाकरे यांनी राज्याला एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली होती. यानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी उध्दव ठाकरेंना आव्हान देताना यापुढे जर फडणवीस यांच्याबद्दल बोलताना मर्यादा ओलांडल्या तर त्यांना भाजपचे कार्यकर्ते घराबाहेर पडू देणार नाही, त्यांचा घरकोंबडा करतील असं म्हटलं होतं. आता यानंतर ठाकरे गटाचे नेते व आमदार नितीन देशमुखांनी बावनकुळेंना मतिमंद माणूस म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.

Chandrashekhar Bawankule
Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्पही भाजपमध्ये ? ; त्यांचे सूटबूट वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ..

आमदार नितीन देशमुखां(Nitin Deshmukh)नी चंद्रशेखर बावनकुळेंच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. देशमुख म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे हा एक मतिमंद माणूस आहे. त्याची काय औकात आहे उध्दव ठाकरेंना मातोश्रीवर बाहेर न पडून देण्याची असंही देशमुख म्हणाले. जर ओरिजनल दूध पिलं असाल तर मातोश्रीबाहेर येऊन उध्दव ठाकरेंना रोखूनच दाखवा असं खुलं आव्हानही बावनकुळे यांना दिलं आहे.

बावनकुळे काय म्हणाले होते ?

'फडणवीसांबाबत बोलाल तर याद राखा, आमच्या नेत्यांवरची टीका सहन करणार नाही. याला धमकी समजा. उद्धव ठाकरे यांनी लिमीट पार केली तर आम्हालाही लिमीट पार करावी लागेल. आज उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray)नी लिमीट पार केली असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.

Chandrashekhar Bawankule
Nana Patole News: पटोलेंवरुन आघाडीत बिघाडी? राष्ट्रवादीनेही आळवला नाराजीचा सूर; हायकमांड काय निर्णय घेणार?

तसेच देवेंद्र फडणवीसांची बरोबरी करण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नसल्याची बोचरी टीका केली होती. बाळासाहेबांचे टाचणीभर ही गुण हे उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. मुलगा म्हणून सोडले तर तर उद्धव ठाकरे यांच्याकडे ना बाळासाहेबांचे विचार आहे, ना त्यांच हिंदुत्व आहे, ना तसं कर्तृत्व आहे असेही बावनकुळे यांनी म्हटले.

मला त्यांच्यापेक्षाही खालच्या भाषेत बोलता येतं, पण...

नेमकं फडतूस कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, मी नागपूरचा असल्याने मला यापेक्षाही खालच्या भाषेत बोलता येतं. मात्र, मी तसं बोलणार नाही. कारण तसं बोलण्याची माझी पद्धत नाही.

'' झुकेगा नही साला...''

'आज उद्धव ठाकरे मला फडतूस म्हणाले, पण मी फडतूस नाही, काडतूस आहे. झुकेगा नही साला, मैं घुसेगा' अशा फिल्मी डायलॉग घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या टीकेला प्रतिउत्तर दिलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com