Parinay Phuke News : डाॅ. परिणय फुकेंच्या गाडीला अपघात, थोडक्यात....

Parinay Phuke Car Accident : माजी मंत्री आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला.
Parinay Phuke Car Accident
Parinay Phuke Car Accidentsarkarnama

Loksabha Election : विदर्भातील पाच जागांच्या मतदानासाठी अवघे तीन दिवस राहिले आहेत. त्यामुळे नेते प्रचारात व्यग्र आहेत. प्रचारासाठी रात्रंदिवस एक करत असताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. आता बुधवारी (ता.17) मध्यरात्री माजी मंत्री आणि भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या गाडीला भीषण अपघात होणार होता. पण चालकाच्या समयसूचकतेमुळे हा अपघात टळला. मात्र, फुके यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला आहे.

Parinay Phuke Car Accident
Ravikant Tupkar News : "तुमचीच तंबाखू, तुमचाच चुना, मला फक्त निवडून आणा, हाच जाधवांचा धंदा," रविकांत तुपकर बरसले

महायुतीचे भंडारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारात परिणय फुके (Parinay Phuke) व्यग्र होते. मंगळवारी रात्री प्रचारासाठी ते अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव येथे गेले होते. प्रचारानंतर ते रात्री उशिरा निघाले. मध्यरात्री दोनच्या सुमारास साकोली जवळ एक अज्ञात वाहन डॉ. फुके यांच्या वाहनासमोर आले, पण त्यांच्या चालकाने समयसूचकता दाखवली. त्यामुळे अपघात टळला. फुके यांचे वाहन अपघातातून बचावले, पण त्यांच्या ताफ्यातील एक वाहन महामार्गावरील दुभाजकावर आदळले. या अपघात (Accident ) वाहनातील सुरक्षारक्षक आणि इतर सहकारी जखमी झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आठ दिवसांपूर्वी नाना पटोलेंचा अपघात

आठ दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील प्रचार सभा संपवून परतीचा प्रवास करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भीषणा अपघात झाला होता. एका ट्रकने नाना पटोले प्रवास करणाऱ्या कारला धडक दिली होती. अपघात कारचे मोठे नुकसान झाले. याविषयी ट्विट करत घातपाताचा संशय नाना पटोले यांनी केला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणीदेखील केली होती.

प्रचाराला वेग

विदर्भातील पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. त्यामुळे मतदारसंघात पोहाेचण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. विश्रांती घेण्यासदेखील नेत्यांना वेळ मिळत नसल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. पण नाना पटोले यांच्या वाहनाला झालेल्या अपघातानंतर परिणय फुके यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाल्याने चिंत व्यक्त करण्यात येत आहे.

(Edited By Roshan More)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com